सानगडीत २०७ वर्षांपासून रथयात्रेची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:28 AM2018-11-23T00:28:55+5:302018-11-23T00:29:19+5:30
ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली. २१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सानगडी : ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली.
२१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सानगडी येथील रथयात्रेला विशेष महत्व असून २०७ वर्षापासूनची ही अखंड परंपरा आताही सुरू आहे. दूरवरून ही रथयात्रा बघायला लोक या ठिकाणी आले.
श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान सानगडीच्या वतीने निघालेल्या रथयात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २१ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता परम भगवान विठ्ठलाची महापूजा पुरोहित दत्तात्रय गाडे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे ५ वाजता ध्यान काकड आरती, सायंकाळी ५ वाजता सामुदायीक प्रार्थना, ६ वाजता हरिपाठ २० नोव्हेंबरला ३ वाजता हंडीफोड व म्युजीक बॉल, चमचा गोळी, मेनबत्ती स्पर्धा, लंगडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
२१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता रथ सजावट, सायंकाळी ६ वाजता तुळशी विवाह व रात्री ८.२० वाजता रथपूजा व रथयात्रेत प्रारंभ करण्यात आले.
या यात्रेत भंडारा जिल्हा परिषद सदस्या रेखाताई वासनिक, पंचायत समिती सभापती धनपाल उंदिरवाडे, नवनिर्वाचित सरपंच उषा करपते, सरपंच रेखाताई वंजारी उपस्थित होते. २२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता काल्याचे कीर्तन गणेश नानेलवार यांचे हस्ते पार पडले.
यावर्षी रथमहोत्सवामध्ये आकर्षक म्हणून शारीरिक कवायतीचे कार्यक्रम उस्ताद धनराज साखरे, जासवंत डुंडे, समोरा खाँ पठान यांच्या उपस्थितीत पार पडले. धार्मिकत बरोबरच सामाजिक जनजागृतीचा मंगळातर्फे महत्व देण्यात येत असून उपरोक्त आधुनिक युगातही ही रथयात्रा आजही आपले वर्चस्व टिकवून आहे.
विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. प्रत्येकाच्या तोंडी एकच वचन दिसून येत होता तो म्हणजे जाऊ देवाचिमे गावा देव देईल विसावा. देवस्थान कमेटीच्या वतीने गिरीधर नेवारे, राजेश पेशेकर, शिवताप वाघाडे, हरिचंद्र राऊत, हिरामन कोहळे, तसेच भाविक सानगडीवासी यांनी अथक प्रयत्न केले.