शहरात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:00 AM2019-08-31T01:00:09+5:302019-08-31T01:00:41+5:30

शहरात आधीच अरुंद रस्ते आणि त्यावर असलेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची नेहमी कोंडी होते. शहरातील राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, गांधी चौक, मोठा बाजार परिसर, शास्त्री चौक, खांबतलाव चौक, गभने चौक, बसस्थानक परिसर येथे मोठी गर्दी असते. अरुंद रस्त्यावरून आपली वाहने काढताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Traffic congestion in the city | शहरात वाहतुकीची कोंडी

शहरात वाहतुकीची कोंडी

googlenewsNext
ठळक मुद्देसणासुदीचे दिवस : गांधी चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुंबईच्या वाहतूक नियंत्रणाचा दांडगा अनुभव असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक असतानाही भंडारा शहरातील वाहतुकीचे दररोज धिंडवडे निघत आहे. सणासुदीच्या दिवसात रस्त्यावर होणारी गर्दी नियंत्रणासाठी कुठेही पोलीस दिसत नाही. पोळ्याच्या दिवशी गांधी चौकात तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून कुणीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढे आले नाही.
शहरात आधीच अरुंद रस्ते आणि त्यावर असलेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची नेहमी कोंडी होते. शहरातील राजीव गांधी चौक, त्रिमुर्ती चौक, गांधी चौक, मोठा बाजार परिसर, शास्त्री चौक, खांबतलाव चौक, गभने चौक, बसस्थानक परिसर येथे मोठी गर्दी असते. अरुंद रस्त्यावरून आपली वाहने काढताना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. अनेक व्यवसायीकांनी आपली दुकाने थेट रस्त्यालगतच थाटली आहे. त्यातच खरेदीसाठी येणाऱ्या वाहनधारकांची मोठी गर्दी होते. शुक्रवारी पोळ्याचा सण साजरा झाला. सकाळपासूनच नागरिकांनी गांधी चौकासह विविध परिसरात खरेदीसाठी गर्दी केली. यामुळे गांधी चौकात वाहतुकीची कोंडी झाली. तब्बल अर्धा तास वाहने जागची हालली नाही. हा प्रकार काही सुज्ञ नागरिकांनी वाहतूक शाखेला सांगितला. त्यावेळी एखादा पोलीस कर्मचारी पाठवितो एवढा निरोप दिला. परंतु तेथे पोलिसच पोहचला नाही. गत तीन महिन्यांपासून गांधी चौकात वाहतूक शिपाई राहत नसल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांनी वाहतुक कोंडीवर उपाययोजनाची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Traffic congestion in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.