तुमसर बपेरा राज्य मार्गावरील गतिरोधक ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:07 AM2021-02-06T05:07:03+5:302021-02-06T05:07:03+5:30

नाका डोंगरी राज्य मार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याने तुमसर बपेरा राज्य मार्गावर वाहतुकीच्या वर्दळीत वाढ झाली आहे. राज्य मार्गावर भरधाव ...

On the traffic jam on Tumsar Bapera State Highway | तुमसर बपेरा राज्य मार्गावरील गतिरोधक ऐरणीवर

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील गतिरोधक ऐरणीवर

Next

नाका डोंगरी राज्य मार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याने तुमसर बपेरा राज्य मार्गावर वाहतुकीच्या वर्दळीत वाढ झाली आहे. राज्य मार्गावर भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने अपघात वाढले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी सिहोऱ्याचा राज्य मार्गावर असणारा आठवडे बाजार हलविला आहे. आठवडे बाजारात ग्राहक व दुकानदारांची वर्दळ असल्याने सकारात्मक निर्णय त्यांनी घेतला आहे. दरम्यान तुमसर बपेरा राज्य मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. आठवडाभरात खड्डे तयार होत आहे. यामुळे खड्ड्यात पुन्हा अपघात वाढले आहेत. वाढते अपघात थांबविण्यासाठी राज्य मार्गावर गतिरोधक तयार करण्याची ओरड गावकरी करीत आहेत. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनावर अंकुश घालण्यासाठी पोलीस विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्य मार्गावर गतिरोधक तयार करण्यासाठी पत्र दिले. परंतु या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही. पोलिसांचे पत्राला बेदखल करण्यात आल्याने गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त खड्डे बुजविण्यात व्यस्त असला तरी अपघात थांबले नाहीत. भरधाव वेगात वाहने धावत असल्याने अपघात होत आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी गंभीर दिसत नाही. राज्य मार्गावर वाढत्या झुडपांचा प्रश्न कायम आहे. राज्य मार्ग अरुंद असल्याने अपघात वाढत आहेत. परंतु कुणी गांभीर्याने घेत नाहीत. या राज्य मार्ग दुरुस्तीचे निविदा निघाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली नाही. घोडे कुठे अडले आहेत, कुणी सांगायला तयार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत निधी नसल्याचे सांगण्यात येत आहेत. राज्य मार्ग दुरुस्तीवरुण नागरिकांत आक्रोश आहे. राज्य सरकारने तत्काळ राज्य मार्ग दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: On the traffic jam on Tumsar Bapera State Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.