राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:46 PM2019-03-29T22:46:15+5:302019-03-29T22:46:39+5:30

शहरानजिक वैनगंगा पुलावर दोन ट्रकमध्ये पहाटे झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सायंकाळ झाली. या अपघातानंतर दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

The traffic on the National Highway jammed for four hours | राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प

Next
ठळक मुद्देवैनगंगा पुलावर अपघात : दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरानजिक वैनगंगा पुलावर दोन ट्रकमध्ये पहाटे झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. तर वाहतूक सुरळीत होण्यासाठी सायंकाळ झाली. या अपघातानंतर दोन्ही बाजूला दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कारधानजीक वैनगंगेच्या पुलावर शुक्रवारी पहाटे दोन ट्रक एकमेकावर आदळले. यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प पडली. अवजड असलेले दोन ट्रक क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर दोनही ट्रक बाजूला करण्यात आले. परंतु तोपर्यंत दोनही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील वाहतुकीवरील याचा परिणाम झाला होता. अनेक वाहने तासंनतास अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी ११ वाजताच्यानंतर भंडारा शहराकडील बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती हाताळताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती. लहान अपघात झाल्यानंतरही वाहतूक ठप्प पडते. परंतु बायपासच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही.

Web Title: The traffic on the National Highway jammed for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.