जुन्या पुलावरून वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:59 AM2019-07-08T00:59:12+5:302019-07-08T00:59:33+5:30

वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे.

Traffic on old bridge continues | जुन्या पुलावरून वाहतूक सुरूच

जुन्या पुलावरून वाहतूक सुरूच

Next
ठळक मुद्देइशारावजा फलकाकडे दुर्लक्ष : अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशारावजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र, तरीही याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक करतच आहेत.
नवीन पुलावरून गेल्यास लांबचे अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात याच पुलाचा वापर करत आहेत. वैनगंगा नदीवरील ९० वर्षे जुना इंग्रजकालीन पूल २०१६ मध्ये वाहतुकीसाठी धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. नागरिकांच्या माहितीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात फलक लावले आहेत.
हा पूल भंडारा ते पवनी, साकोली या मार्गांना जोडणारा एकमेव पूल होता. पावसाळ्यात बरेचदा अतिवृष्टी झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली येत असे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पूर्णपणे बंद व्हायचा, याला पर्याय म्हणून एक नवीन मोठा पूल तयार करण्यात आला आहे. पूलाच्या निर्मितीनंतरही नवीन आणि जुना दोन्ही पूल वाहतुकीसाठी सुरू होते. मात्र, २०१६ मध्ये या इंग्रजकालीन जुन्या पुलाची तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.
जुन्या पूलावरून सर्वच वाहतूक बंद झाल्याने नवीन पुलावर वाहतुकीचे प्रमाण वाढले. बाहेरगावाहून येणाºया कामगारांना सायकलवरून प्रवास करताना अडचणी निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे पादचारी लोकांनाही या वाढलेल्या वाहतुकीचा त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीवरून जुन्या पूलावर पादचारी आणि सायकलने जाणाºया लोकांसाठी एका भागावरून जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला. मात्र, आता या पूलावरून दुचाकी आॅटो रिक्षा यांची ही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.

Web Title: Traffic on old bridge continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.