जिल्हाधिकारी, एसपींच्या उपस्थितीत पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:47+5:302021-04-04T04:36:47+5:30

मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. ३ मार्च रोजी ...

Traffic in the presence of Collector, SP | जिल्हाधिकारी, एसपींच्या उपस्थितीत पथसंचलन

जिल्हाधिकारी, एसपींच्या उपस्थितीत पथसंचलन

Next

मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. ३ मार्च रोजी पवनी तालुक्यात ८८ कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर तालुक्यात ४२६ रुग्ण अक्टिव्ह आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी जिल्हाभरात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यादृष्टीने पवनी शहरात जिल्हाधिकारी व एसपी यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने पथसंचलन करून नियमांचे पालन करा, असा संदेश दिला.

कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाही काही नागरिक अजून मास्क न लावताच फिरत आहेत. या बाबतीत दंडात्मक कारवाई करूनही जबाबदारीचे वहन होताना दिसत नाही. ही बाब नागरिकांमध्ये जाऊन सांगण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील दोन सर्वोच्च अधिकारी या पथसंचलनात सहभागी झाले. त्यांनी नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केले.

कोरोना वाढीचा वेग पाहता नियमांचे काटेकोर पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून, आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. कोविडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा. साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी २० सेकंद व्यवस्थित धुवा. साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

Web Title: Traffic in the presence of Collector, SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.