वीज तारा दुरुस्तीसाठी थांबविली वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:00 AM2019-06-23T01:00:18+5:302019-06-23T01:00:59+5:30
भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले. कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव : भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या महावितरण कार्यालयाकडे सुविधांची वाणवा असल्याचा प्रत्यय आसगाव येथील रस्त्यावरच्या तारा जोडताना घेतलेल्या ट्रकच्या आधाराने दिसून आले.
कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या महावितरण केंद्र उंचावरील तारा जोडणीसाठी स्वतंत्र साधन नाही. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर विद्युत खांबावरील तारा लोंबकलेल्या आहेत. विद्युत मंडळाकडून तारा सरळ करण्याचे काम सुरु आहे. मात्र विद्युत मंडळाजवळ आसगाव कार्यालयाकडे हे काम करण्यासाठी सीडी गाडीच नाही. त्यामुळे येथील मंडळ कर्मचाऱ्यांनी तारा जोडणीसाठी नामी शक्कल लढविली. त्यांनी आसगाव बसस्थानकाजवळील पवनी आसगाव लाखांदूर रस्त्यावरील मालवाहू मोठ्या ट्रकलाच थांबविले. त्या ट्रकचा आधार घेत विद्युत मंडळाचे कर्मचारी वर चढून काही वेळा करीता वाहतुक थांबविली.
लोंबकळलेल्या तारा सरळ करण्यासाठी मालवाहू ट्रकवर बसून लूजस्टॅन्ड लावण्यात आले. तेव्हा बघ्याची गर्दी जमली होती. आसगाव विद्युत वितरण मंडळ कार्यालयाचा सीडी गाडीची व्यवस्था करुन द्यावी, अशी मंडळ कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
मान्सून पूर्व कामांना गती देण्याची गरज आहे. शेतशिवारात अनेक ठिकाणी तारा, खांब हे धोकादायक स्थितीत आढळून येत असल्याने याकडे वीज वितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मशागत कामासाठी अनेक शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहे. अधिकाऱ्यांची उदासिनता कारणीभूत ठरत असल्याने त्यांचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. कंपनीने पावसाळ्यापुर्वी कामे पुर्ण करण्याची मागणी आहे.