तुमसर बाजारात वाहतुकीची कोंडी
By Admin | Published: February 5, 2017 12:21 AM2017-02-05T00:21:14+5:302017-02-05T00:21:14+5:30
शहरात रस्ते अरुंद, वाहनाची संख्या जास्त तथा नियोजनाचा अभावामुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते.
बायपास रस्ता केव्हा होणार : आठवडी बाजार हलविण्याची मागणी
तुमसर : शहरात रस्ते अरुंद, वाहनाची संख्या जास्त तथा नियोजनाचा अभावामुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. शहरातील नवीन बसस्थानक ते जुने बसस्थानक व जवाहर चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते.
तुमसर शहराची लोकसंख्या ४७ हजार इतकी आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत होत आहे. रस्ते जसे आहेत त्याच स्थितीत आहेत. नवीन बसस्थानक ते जुने बसस्थानक पर्यंत मुख्य रस्ता आहे. आंतरराज्यीय मध्यप्रदेशाकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. बायपास रस्त्याचा सर्वे सहा ते सात वर्षापूर्वी झाला होता. परंतु अजूनपर्यंत काहीच हालचाली झाल्या नाही. भंडारा तुमसर, कटंगी तथा वारासिवनीकडे या मार्गाने जाता येते. नवीन तुमसर भंडारा रोडवर वाढत आहे. केंद्रीय रस्ते निधीमधून पंचायत समिती कार्यालय ते जुने बसस्थानक पर्यंत रस्ता तयार करण्यात आला होता. रस्त्यावर दुभाजक सुद्धा लावण्यात आले. तुमसर रोड - तिरोडी रेल्वे ट्रॅक खापा टोली परिसरातून जातो. फाटक बंद वेळी दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागतात. येथे त्यानंतर वाहतुकीची कोंडी तयार होते. शहराचा मुख्य मार्ग चिंचोळ्या गल्लीसारखा झाला आहे. दोन्ही बाजूला दुकाने आहेत. रस्त्याने मोठी वर्दळ असते. वाहने, पादचारी यांची संख्या मुख्य मार्गावर जास्त राहते. मंगळवारी आठवडी बाजाराच्या दिवशी गर्दी रस्त्यावर दिसते. पार्कींगची सोय शहरात नाही.
(तालुका प्रतिनिधी)