भंडारा येथे उच्च माध्यमिक इंग्रजी शिक्षकांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:52 PM2019-06-30T21:52:00+5:302019-06-30T21:52:17+5:30

प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तज्ज्ञत्व औरंगाबाद) शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा, डाय सीपीडी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा अभियान उच्च माध्यमिक स्तर प्रशिक्षण गरजांचा अभ्यास वर्ग अकरावी व बारावीला इंग्रजी विषय शिकविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षण बैठक जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली.

Training of Higher Secondary English Teachers at Bhandara | भंडारा येथे उच्च माध्यमिक इंग्रजी शिक्षकांचे प्रशिक्षण

भंडारा येथे उच्च माध्यमिक इंग्रजी शिक्षकांचे प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियान : प्रशिक्षणाला जिल्ह्यातील ८६ उच्च माध्यमिक शिक्षकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तज्ज्ञत्व औरंगाबाद) शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा, डाय सीपीडी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा अभियान उच्च माध्यमिक स्तर प्रशिक्षण गरजांचा अभ्यास वर्ग अकरावी व बारावीला इंग्रजी विषय शिकविणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षण बैठक जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.ज्ञानेश्वर गौपाले (कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख जे.एम. पटेल कॉलेज भंडारा) होते. प्रमुख अतिथीमध्ये प्राध्यापिका सारिका, प्रा.अश्विनी पाटील, प्रा.नदीम खान (अ‍ॅकेडमी कमिटी मेंबर) प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रमोद इंगोले (न.प. ज्युनिअर कॉलेज पवनी) यांनी केले. तर डॉ.रवींद्र जनबंधू यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद तर्फे राबविल्या जाणाºया इंग्रजी विषयाला विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. प्रा.नदीम खान यांनी चेस अंतर्गत राबविण्यात येणाºया नवोदीत प्रकल्पाविषयी पीपीटीच्या सहाय्याने उपस्थित शिक्षकांना विस्तृत माहिती दिली.
यावेळी प्रा.नदीम खान यांच्या कल्पकतेतून भंडारा जिल्ह्यातील इंग्रजी शिक्षकांचे चेसगृप तयार करण्यात आले. त्यामुळे इंग्रजी विषयाच्या बदलत्या अभ्यासक्रमाचे आकलन होऊन आदानप्रदान करणे सोपे जाईल.
याप्रशिक्षण बैठकीला भंडारा जिल्ह्यातील ८६ उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.एस.आर. सावरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Training of Higher Secondary English Teachers at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.