बोरगाव येथे आॅनलाइन ई पीक पाहणी अॅपचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:06+5:302021-09-11T04:36:06+5:30
करडी (पालोरा) : बोरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय पांजरा यांच्या सौजन्याने मोबाईल ऑनलाईन ई-पीक पाहणी व खरीप ...
करडी (पालोरा) : बोरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय पांजरा यांच्या सौजन्याने मोबाईल ऑनलाईन ई-पीक पाहणी व खरीप हंगाम पीक खसरा नोंद प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. मोबाईलवरून ई-पीक पाहणी ॲपचे माध्यमातून स्वतःच स्वतःचे शेतावर जाऊन पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर कशी घ्यावी, यासंबंधीची माहिती शिबिरातून देण्यात आली. तसेच शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री, नैसर्गिक आपत्तीत मदत, वन्य प्राण्यांपासून होणारी नुकसानभरपाई मिळण्यासाठी या नोंदी अतिशय महत्त्वाच्या आहेत. नोंदणी न झाल्यास नोंदणीपासून शेतकरीवर्गास वंचित राहावे, असेही समजावून सांगण्यात आले. या वेळी बोरगावचे सरपंच अर्चना पिंगळे, तलाठी कांबळे, सामाजिक कार्यकर्ता शामराव पिंगळे, माजी उपसरपंच रवींद्र अतकरी, सुनील नखाते, शिवनाथ पिंगळे, प्रवीण बोरकर, श्रावण बाम्हणे, कैलास बाम्हणे, सुनील अतकरी व अन्य शेतकरी उपस्थित होते.
100921\img-20210910-wa0082.jpg
बोरगाव येथे आँनलाईन इ - पीक पाहणी अँपचे प्रशिक्षण