सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे हस्तांतरण रखडले
By admin | Published: November 6, 2016 12:30 AM2016-11-06T00:30:06+5:302016-11-06T00:30:06+5:30
महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तीन विभागाचे हस्तक्षेप असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे.
एका योजनेत तीन विभागांचा हस्तक्षेप : प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीतच
रंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)
महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तीन विभागाचे हस्तक्षेप असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. या एकमेव प्रकल्पात विदर्भ पाठबंधारे विभाग, धापेवाडा उपसा सिंचन योजना आणि लघु पाटबंधारे विभाग अशा तीन विभागाचे नियंत्रण प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नसल्याने आहे. यामुळे प्रकल्पाच्या अडचणीत वारंवार वाढ होत आहे.
सिहोरा परिसरात असणाऱ्या बावनथडी नदीवरील महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे हस्तातरण झाले नसल्याने तीन विभागाना या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. या प्रकल्पाचे हस्तांतरणासाठी प्रयत्न सुरू झाले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. या ११० कोटी रूपये खर्चून तयार करण्यात आलेल्या प्रकल्पात खंबीरतेने नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. या प्रकल्पाने चांदपूर जलाशयात उपसा केलेल्या पाणी वाटप व पाणी पट्टी करांच्या वसुलीचे अधिकारी लघु पाटबंधारे विभागाकडे आहेत. हा विभाग शेतकऱ्यांना पाणी वाटप व पाणी पट्टी कराची वसुली करून शासनाच्या तिजोरीत राशी जमा करीत आहे. प्रकल्प स्थळात बांधकाम व नियंत्रणाची जबाबदारी धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे देखरेख खाली आहे. या प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता यांचे नियंत्रण प्रकल्पात आहे तर थकीत विज बिल देणकांसाठी विदर्भ पाठबंधारे विभागाकडून मदत घेतली जात आहे. प्रकल्प स्थळात अडचणी व समस्या निर्माण झाल्यास सर्व विभागाची यंत्रणा कानावर हात ठेवत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे हस्तांतरण करण्याची ओरड जुनीच आहे. परंतु ही प्रक्रिया सुरू करण्यात आलीनाही. प्रकल्पस्थळात सन २००७ पासून पाण्याचा उपसा सुरू आहे. दरवर्षी थकीत विज देयकामुळे विज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. पावसाळापुर्वी खंडीत विज पुरवठा सुरू करण्यासाठी आंदोलन पेटविले जात आहे. परंतु सुरळीत विज पुरवठा ठेवण्यासाठी एका यंत्रणेकडून प्रयत्न केले जात नाही. यामुळे तब्बल वर्षभर हा प्रकल्प अंधारात ठेवण्यात येत आहे.
पाणी पट्टी करांची वसुली करणाऱ्या पाटबंधारे विभागाने या प्रकल्पाचे हस्तांतरण करण्याची ओरड आहे. या विभागाने हस्तातरण केल्यास दोन विभागाची सुटका होणार आहे. या विभागात रिक्त पदे असल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे.
शेतकऱ्यांकडे १७५ लाखांची थकबाकी
सिहोरा परिसरात लघु पाठबंधारे विभाग मार्फत डावा आणि उजवा कालवा अंतर्गत खरीप हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत आहे. पाणी वाटप प्रक्रिया कंत्राट पद्धतीने राबविली जात असून रिक्त पदामुळे या विभागाचा प्रशासकीय कारभार प्रभावित आहे. यामुळे पाणी पट्टी कराची वसुली अडचणीत येत आहे. पाणी वाटप संस्थाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांकडे १७५ लाख रूपयाची थकबाकी आहे. यामुळे सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे थकीत विजेचे देयक अदा करताना समस्या निर्माण होत आहे.
प्रकल्प स्थळात अंधार
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प ६० लाख रूपयांचे विज बिलाची थकबाकी असल्याने विज वितरण कंपनी मार्फत विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ११० कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पात अंधाराचे साम्राज्य आहे. सुरक्षा गार्ड यांनी अडचणीत आली आहे.
नहराची स्थिती चिंताजनक
उन्हाळी धान पिकाला पाणी वाटप करण्यासाठी यंत्रणा नियोजनात गुंतली आहे. अंदाजीत ६०० हेक्टर आर पर्यंत शेतीला पाणी वाटप करण्याचे प्राथमिक अंदाज असले तरी शिल्लक २२ फुट पाणी असल्याने यंत्रणा बुचकाड्यात पडली आहे. ३५०० हेक्टर आर शेतीला पाणी वाटप करताच येत नसल्याने शेतऱ्यांची ओरड लक्षात घेता यंदा उन्हाळी धान पिकांला पाणी वाटपाला स्थगती देणार असल्याची शक्यता आहे.
पाणीपट्टी कराचे देयक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. यामुळे सोंड्याटोला प्रकल्पाचे विजेचे देयक भरल्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पाठबंधारे विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे.
-मोतीलाल ठवकर, सिंदपुरी.