‘त्या’ वसाहतीचे कर्मचाऱ्यांना हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:40 AM2017-12-26T00:40:16+5:302017-12-26T00:40:29+5:30
दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय आवारात बांधकाम करण्यात आलेले वसाहतीचे कर्मचाऱ्यांना हस्तांतरण करण्यात आले आहे. यात शासकीय बांधकामात उद्घाटन प्रक्रियेला तिलांजली मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालय आवारात बांधकाम करण्यात आलेले वसाहतीचे कर्मचाऱ्यांना हस्तांतरण करण्यात आले आहे. यात शासकीय बांधकामात उद्घाटन प्रक्रियेला तिलांजली मिळाली आहे.
सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असतांना दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त होत असल्याने रुग्णांचा उपचारासाठी वाढता कल आहे. पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छता, निटनिटके वातावरण या ग्रामीण रुग्णालयाची जमेची बाजू आहे. गावापासून १ किमी अंतरावर असणाºया या ग्रामीण रुग्णालयात महिला व पुरुष १ किमी अंतरावर असणाऱ्या या ग्रामीण रुग्णालयात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीचे बांधकाम करण्याची जुनी ओरड होती. शासनाने कर्मचाऱ्यांचे वसाहतीचे बांधकाम मंजूर केले. या वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले असतांना शसकीय बांधकामाचे उद्घाटनाची परंपरा कायम राखणार अशी चर्चा सुरु झाली. नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनाची प्रतिक्षा करित असताना विलंब होत आहे. यामुळे अनेक इमारती भंगारात निघत आहेत. या वसाहतीच्या उद्घाटनाची प्रतिक्षा करण्यात आली नाही. सुसज्ज इमारतीचे बांधकाम झाले असता वसाहतीला कर्मचाºयांना हस्तांतरीत करण्यात आले आहे. रुग्णालय कल्याण समितीने उत्तम आणि चांगला निर्णय घेतला असल्याची सुर गावता आहे.
या वसाहतीत कर्मचाऱ्यांचे वास्तव्य सुरु झाले आहे. यामुहे रात्री कर्मचारी रुगणांना आरोग्य सेवा उपलब्ध करीत आहेत. या रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त आहे. एकमेव वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश खुणे कार्यरत आहेत. या रुग्णालयात गेल्या १५ वर्षापासून महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. अन्य कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. हिवाळ्यात ओपीडीची संख्या कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवा बजावितांना अधिकचा त्रास होत नाही. परंतु उन्हाळा आणि पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना वाढत्या ओपीडीने त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी रिक्त पदे भरण्यावर अधिक भर दिला पाहिजे.
चुल्हाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकिय अधिकारी डॉ. चव्हाण कार्यरत आहेत. बपेरा येथील आग्ंल दवाखन्यात डॉक्टर नाहीत. आरोग्य सेवा प्रभावित ठरत आहे. आरोग्य सेवेत असणारे रिक्त पदे भरण्यासाठी जलद गतीने प्रयत्न झाले पाहिजे. अधिक माहितीसाठी डॉ. अविनाश खुणे याच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
वसाहतीचे उद्घाटण महत्वाचे नसून कर्मचाऱ्यांचे वास्तव्यासाठी जलद गतीने देण्यात आली. हा चांगला निर्णय आहे. रिक्त पदे भरण्यासाठी आ. चरण वाघमारे यांचे सोबत चर्चा करणार आहे.
-बंडू बनकर
उपाध्यक्ष भाजपा भंडारा