पोलीस बहुउद्देशीय सभागृहाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:16 PM2019-02-13T22:16:28+5:302019-02-13T22:16:50+5:30

पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाची दुरवस्था झाली होती. १९८६ पासून हा हॉल वापरात नव्हता. या हॉलची दयनीय अवस्था पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हा हॉल सुसज्ज करण्यात आला असून त्याचे लोकार्पण विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.

Transforming Police Multipurpose Hall | पोलीस बहुउद्देशीय सभागृहाचा कायापालट

पोलीस बहुउद्देशीय सभागृहाचा कायापालट

googlenewsNext
ठळक मुद्देनूतनीकरणानंतर लोकार्पण : विशेष पोलीस महानिरीक्षकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाची दुरवस्था झाली होती. १९८६ पासून हा हॉल वापरात नव्हता. या हॉलची दयनीय अवस्था पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हा हॉल सुसज्ज करण्यात आला असून त्याचे लोकार्पण विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.
भंडारा येथील पोलीस मुख्यालय परिसरात प्रशस्त असा बहुउद्देशीय हॉल आहे. परंतु १९८६ पासून त्याकडे दुर्लक्ष होत गेले. पोलिसांचे विविध कार्यक्रम याठिकाणी घेतले जात होते. लग्न समारंभापासून विविध कार्यक्रम होत होते. परंतु दुर्लक्ष झाल्याने हा हॉल अडगळीत पडला होता. याची पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दखल घेतली. त्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षकांसोबत चर्चा केली.
सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळाली. गृह पोलीस उपअधीक्षक बंडोपंत बनसोडे यांना नूतनीकरणाची जबाबदारी दिली. अगदी कमी वेळात या हॉलचे नूतनीकरण करून लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्याला पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधीक्षक बंडोपंत बनसोडे आदी उपस्थित होते.
खासगी कार्यक्रमांना मिळणार सभागृह
पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या हॉलचे नूतनीकरण आणि रंगरंगोटी करण्यात आली. याठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारीच नाही तर खासगी व्यक्तींच्या कार्यक्रमांसाठीही हॉल दिला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले. या ठिकाणी लग्न, वाढदिवस व इतर कार्यक्रम पार पडतील.

Web Title: Transforming Police Multipurpose Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.