पारदर्शकता हा महिलांचा जन्मजात गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:44+5:302021-03-13T05:03:44+5:30
लाखांदूर :- राजमाता जिजाऊ यांच्यापासून किंवा त्यापूर्वी पासून महिलांना जेव्हा जेव्हा सामाजिक , आर्थिक , राजकीय ,व्यापार , संरक्षण, ...
लाखांदूर :- राजमाता जिजाऊ यांच्यापासून किंवा त्यापूर्वी पासून महिलांना जेव्हा जेव्हा सामाजिक , आर्थिक , राजकीय ,व्यापार , संरक्षण, सनदी अधिकारी, सामान्य कर्मचारी ते गृहिणी या सर्व क्षेत्रात संधी मिळाली. महिलांनी अत्यंत पारदर्शकपणे संपूर्ण जबाबदारी सांभाळली आणि देशाचेच नव्हे तर अख्ख्या जगाचे नेतृत्व समर्थ पणे केले, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री ज्योत्स्ना देशमुख यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाखांदूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष कविता राऊत , भारती दिवठे, नीलम हुमने, ज्योती रामटेके, पदमा मेश्राम, मेघा बोरकर, ज्योत्स्ना पिल्लारे, स्मिता ठाकरे, अस्मिता मेश्राम, राधा मेश्राम, संगीता गुरनुले, दिव्या राऊत आणि वनिता मिसार प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन ज्योत्स्ना कोतरांगे यांनी तर आभार राधा मेश्राम यांनी व्यक्त केले.