लाखनी तालुक्यात १० हजार ५०० हेक्टरवर रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:03 AM2019-08-14T01:03:27+5:302019-08-14T01:04:17+5:30
तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ५० टक्के रोवणी आटोपली आहेत. तालुक्यातील खरिप पिकाचे क्षेत्र एकूण २३ हजार १५९ हेक्टर आहे. तालुक्यात १२ आॅगस्टपर्यंत १० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी पुर्ण झालेली आहे. तालुक्यात १३ आॅगस्टपर्यंत ५७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ५० टक्के रोवणी आटोपली आहेत. तालुक्यातील खरिप पिकाचे क्षेत्र एकूण २३ हजार १५९ हेक्टर आहे. तालुक्यात १२ आॅगस्टपर्यंत १० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी पुर्ण झालेली आहे. तालुक्यात १३ आॅगस्टपर्यंत ५७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात लाखनी येथे ४१९१ हेक्टर, पिंपळगाव (सडक) ४४५१ हेक्टर, पोहरा ५३२९, मुरमाडी (तुपकर) ५६३३ हेक्टर जमिनीवर खरीप हंगामातील धानपिक लावलेले आहे. तालुक्यात एकुण २३ हजार १५९ हेक्टर क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. तालुक्यात २१२६ हेक्टर जमीनीवर आवत्या टाकल्या आहेत. तालुक्यात भात पिकाखालील लाखनी ४०६५ हेक्टर, पिंपळगाव (सडक) ४२६२, पोहरा ५३००, मुरमाडी (तुपकर) ४१३१, पालांदूर चौ. ५३७४ अश्या एकुण २२ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रात धान रोवणी करण्यात येणार आहे.
१३ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील लाखनी १९६६, पिंपळगाव (सडक) १८८० हेक्टर, पोहरा २३८९, मुरमाडी (तुपकर) १७५० हेक्टर, पालांदूर चौ. २५९० हेक्टर अश्या एकुण १० हजार ५७५ हेक्टर जमीनीवर रोवणी पुर्ण झाली आहे. तालुक्यात ३३२ हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी तूर लावगड केली आहे. यासोबतच तालुक्यात १३५४ हेक्टर जमिनीवर कडधान्याची लागवड केली आहे.
तालुक्यात १४५० मिमी सरासरी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. १ जुन ते १२ आॅगस्टपर्यंत ५६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १३ आॅगस्ट रोजी १५.२७ मिमी पाऊस संपूर्ण तालुक्यात पडला आहे.
गेल्या चार पाच दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. तालुक्यातील सिंचनाची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्याही रोवणीला सध्या वेग आला आहे.