बदलीप्रकरण लोकायुक्तांच्या दालनात
By admin | Published: January 13, 2017 12:16 AM2017-01-13T00:16:15+5:302017-01-13T00:16:15+5:30
मे २०१६ मध्ये भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील काही बदल्या नियमबाह्य झाल्याची तक्रार
मुंबईत सुनावणी : लोकायुक्तांच्या निर्णयाकडे शिक्षकाचे लक्ष
तुमसर : मे २०१६ मध्ये भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील काही बदल्या नियमबाह्य झाल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे करण्यात आली. त्या तक्रारीवर १२ जानेवारी रोजी सुनावणी होत आहे. या सुनावणीस राज्याचे शिक्षण अवर सचिव जि.प. चे संबंधित अधिकारी व तक्रारदार शिक्षकाने उपस्थित राहावे असे आदेश प्राप्त झाले आहे.
भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक ३७६ शिक्षकांच्या बदली प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने राबविली होती. मे २०१६ मध्ये बदल्या झाल्या होत्या. बदली स्थळी काही शिक्षक रुजू झाले नाही. यापैकी चार शिक्षकांनी स्वत:च्या बदली प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे ते बदली झालेल्या शाळेत रुजू झाले नाही. यापैकी दावेझरी टोला येथील मुख्याध्यापक अ. वा. बुध्दे यांनी आपल्या बदली संदर्भात राज्याच्या लोकायुक्तांकडे रितसर सर्व पुराव्यानिशी तक्रार दाखल केली. लोकायुक्तांनी तक्रारीची दखल घेतली. १२ जानेवारीला मुंबई येथे लोकायुक्त टहलानी यांच्या दालणात राज्य शासनाचे सचिव, भंडारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तक्रारकर्ते शिक्षक अ. वा. बुध्दे यांची सुनावणी ठेवली आहे. तत्पूर्वी ग्रामविकास मंत्रालयाने संपूर्ण बदली प्रक्रियेला स्थगिती दिली होती. नंतर पुन्हा स्थगिती उठविण्यात आली. बदली झालेले शिक्षक रुजू झाले. सध्या बदली स्थळी रुजू न झालेल्या चार शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहेत. याला आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. लोकायुक्तांच्या निर्णयामुळे भंडारा जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)