ट्रकमध्ये कोंबून बोकडांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:33 PM2018-05-18T22:33:16+5:302018-05-18T22:33:28+5:30
भर उन्हात गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावरून बोकडांची निर्दयपणे ट्रकमध्ये कोंबून सर्रास वाहतूक सुरू आहे. प्राण्यांवर अत्याचाराची ही घटना वेदनादायक आहे. पोलिसांची येथे बघ्यांची भूमिका दिसत आहे. प्राणीमित्रही येथे अनभिज्ञ आहेत. मागील अनेक महिन्यापासून या राज्य महामार्गावर बोकडांची वाहतूक सर्रास सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भर उन्हात गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावरून बोकडांची निर्दयपणे ट्रकमध्ये कोंबून सर्रास वाहतूक सुरू आहे. प्राण्यांवर अत्याचाराची ही घटना वेदनादायक आहे. पोलिसांची येथे बघ्यांची भूमिका दिसत आहे. प्राणीमित्रही येथे अनभिज्ञ आहेत. मागील अनेक महिन्यापासून या राज्य महामार्गावर बोकडांची वाहतूक सर्रास सुरू आहे.
तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावर बोकडांना ट्रकमध्ये कोंबून निर्दयीपणे वाहतूक सर्रास सुरू आहे. त्याकरिता विशेष ट्रकमध्ये व्यवस्था बोकडांकरिता केली आहे. बोकडांच्या देखरेखीकरिता ट्रकच्या वर चार ते पाच इसम बसले असतात. हातात काठी घेऊन त्या बोकडांना हालचाल केल्यावर मारहाण करताना ते दिसतात.
गुरूवारी हैद्राबाद रोडवेज असे नमूद असलेल्या ट्रकमधून शेकडो बोकडांची वाहतूक करणारा ट्रक देव्हाडी रेल्वे फाटकावर थांबला होता. बोकडे प्रचंड आवाज करीत होती तर चार इसम त्यांना काठीने मारहाण करीत होती. हे दृश्य बघणाऱ्यांना वेदनादायी वाटले. परंतु कुणीच समोर आले नाही.
मानवी संवेदना संपल्याचे चित्र रेल्वे फाटकावर दिसले. याबाबत ट्रक चालकाला लोकमत प्रतिनिधीने विचारणा केल्यावर कुणीच बोलले नाही. ‘‘हम ट्रकवाले है, माल इधर के उधर ले के जाते है’’. एवढीेच त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नियमानुसार अशी निर्दयीपणे मुक्या प्राण्यांची वाहतूक करता येत नाही. त्याचेही नियम आहे. राज्य मार्गावर किसान पोलिसांनी कर्तव्य बजाविण्याची गरज आहे. सदर ट्रक छत्तीसगड राज्यातून आंध्रप्रदेश तथा नागपूर येथे जातात, अशी माहिती आहे.