वाहतूक कोंडीने घेतला वृद्धाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:37 AM2017-12-25T00:37:32+5:302017-12-25T00:37:43+5:30
देव्हाडी उडाणपूलाचे काम सध्या सुरु आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनाच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडीने येथे एका वृध्दाचा बळी गेला. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दूचाकीला धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उडाणपूलाचे काम सध्या सुरु आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनाच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडीने येथे एका वृध्दाचा बळी गेला. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दूचाकीला धडक दिली. यात वृध्द गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे एक ते सव्वा तास वाहतूक या मार्गावर ठप्प पडली होती. मृत वृध्दाचे नाव मनोहर निनावे (६५) रा. चांदोरी असे आहे.
चांदोरीवरुन मनोहर निनावे दूचाकी क्रमांक एम एच ३५ एएफ ५५८१ तुमसरला जात होती. देव्हाडी येथे एका अज्ञान वाहनाने दूचाकीला धडक दिली. यात मनोहर निनावे उसळी मारुन फेकल्या गेले. दगडावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेतांनी त्यांचा मृत्यू झाला. तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर सुमारे एक ते सव्वा तास वाहतूकीची कोंडी झाली होती. उडाणपूलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. रेल्वेफाटक बंद असल्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागतात. फाटक उघडताच वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे अपघात वाढले आहेत. रविवारी येथून एक अंत्यसंस्काराकरीता अत्येंष्टी जात होती. त्यांना येथे सुमारे एक तास वाहतुक कोंडीचा फटका बसला. रेल्वे ट्रॅकवरील रस्ता येथे काढण्यात आला. रेल्वे ट्रकजवळील गिटृटी येथे बाहेर आली आहे. येथे वाहल चालवितानी वाहनधारकांना त्रास होतो.
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
तुमसर : पवनारखारी मार्गावर एका अज्ञात वाहनाने एका इसमाला धडक दिली. यात इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकाचे नाव गैदलाल शिवने (६८) रा. गोबरवाही असे आहे. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी गेंदलाल शिवने पवनारखारी मार्गावर फिरायला गेले होते. दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी व पत्नी आहे.
रेल्वेने कटून वृद्धाचा मृत्यू
तुमसर : छत्तीसगड एक्सप्रेस खाली सापडल्याने एका ६० वर्षीय वृध्दाचा कटून मृत्यू झाला. ही घटना शनिवार रात्रीच्या सुमारास घडली. मृत पावलेल्या वृध्दाची ओळख पटू शकलेली नाही. अंगात फुलपँट व शर्ट घातलेला आहे. प्लॅटफार्म क्रमांक २ वर हा अपघात घडला. गोंदिया रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सदर वृध्द कोण आहे. याचा तपास सुरु आहे.