बछडे गमावलेली वाघीण वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:00 AM2021-05-14T05:00:00+5:302021-05-14T05:00:50+5:30

भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळ टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुडून वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या पिलांची आई (वाघीण) याच परिसरात असावी, असा कयास वनविभागाला होता. बछड्यांच्या मृत्यूमुळे ती हिंस्त्र होण्याची शक्यता आहे. यामुळे तिचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसरात चार कॅमेरे लावले. बुधवारी या चारही कॅमेऱ्यात ती दिसून आली.

Trapped in Wagheen Forest Department camera on missing calf | बछडे गमावलेली वाघीण वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप

बछडे गमावलेली वाघीण वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप

Next
ठळक मुद्देगराडाजवळ संचार : परिसरातील गावांना दिला सतर्कतेचा इशारा, वनविभाग लक्ष ठेवून

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दोन बछडे गमावलेली वाघीण वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात बुधवारी ट्रॅप झाली. या वाघिणीचा गराडा परिसरात संचार असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
भंडारा तालुक्यातील गराडा गावाजवळ टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाच्या कालव्यातील सायफन टाक्यात बुडून वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या पिलांची आई (वाघीण) याच परिसरात असावी, असा कयास वनविभागाला होता. बछड्यांच्या मृत्यूमुळे ती हिंस्त्र होण्याची शक्यता आहे. यामुळे तिचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसरात चार कॅमेरे लावले. बुधवारी या चारही कॅमेऱ्यात ती दिसून आली. टी १० वाघीण असून, तिचे हे पहिलेच बछडे होते. दरम्यान, सीसीएफ मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कल्याणकुमार यांनी आज भेट देऊन गराडा परिसराची पाहणी केली. लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले. प्रीकास्ट सीमेंटचे आवरण केले जाणा आहे. या वाघिणीवर उपवनसंरक्षक शिवराम भलावी आणि वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर लक्ष ठेवून आहेत.

बछड्यांच्या शोधात वाघिणीची तळमळ 
पाण्याच्या टाकीत बुडून मरण पावलेल्या बछड्यांसाठी वाघीण सैरभैर झाल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी बछडे मृत्युमुखी पडले, त्या ठिकाणी वाघीण वारंवार वाकून पाहत असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले. ही आणखी १५ ते २० दिवस या परिसरात राहील, असा अंदाज वनविभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. 

 

Web Title: Trapped in Wagheen Forest Department camera on missing calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ