प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:45 AM2019-06-01T00:45:36+5:302019-06-01T00:46:15+5:30

लोकवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जूनला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या वर्धापन दिनासाठी एसटी महामंडळ राज्यभरातील आगारामध्ये विविध उपक्रम साजरा करीत आहे. या उपक्रमामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. सोबतच काही चालक वाहकांचा आज सन्मान होणार आहे.

Travelers will welcome the bouquet | प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करणार

प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करणार

Next
ठळक मुद्देएसटीचा आज वर्धापन दिन : चालक वाहकांचा होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : लोकवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जूनला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या वर्धापन दिनासाठी एसटी महामंडळ राज्यभरातील आगारामध्ये विविध उपक्रम साजरा करीत आहे. या उपक्रमामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. सोबतच काही चालक वाहकांचा आज सन्मान होणार आहे.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून एसटीच्या ताफयातील सर्व बसगाड्या आतून आणि बाहेरुन साफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हादायक वाटेल. बसस्थानके सुशोभीत करण्यात येणार असून या दिवसाचे महत्व प्रवशांना कळावे यासाठी प्रवाशांना फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.
प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून विविध कार्यक्रम आखले आहेत. महामंडळाच्या राज्यभरातील २५२ आगारामध्ये हे कार्यक्रम दिवसभर होणार आहेत. विशेष म्हणजे या दिवशी एसटीचे अधिकारी बस स्थानकावर प्रवाशांसी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत, अशी माहिती साकोली येथील अधिकाऱ्यांनी सांगितली.

परिवहन दिन ऐवजी वर्धापन दिन
स्वातंत्र्यानंतर अहमदनगर-पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली, तेव्हापासून हा दिवस वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो. मागील काही वर्षे हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा केला जात होता.
अधिकारी, कर्मचारी घेणार शपथ
महामंडळाची बस्थानके सुशोभित, केळीचे खांब, आंब्याच्या पानाचे तोरण बांधणे, सजावट करणे, रांगोळ्या, मंद आवाजात सनई वादन, सर्व कर्मचारी व अधिकारी यांना महामंडळाच्या निष्ठेबाबत व प्रयत्नशील राहण्याबाबत शपथ देण्यात येणार आहे.

बसस्थानक सुशोभित करण्यात येईल. ध्वनीप्रक्षेकाद्वारे महामंडळाच्या विविध योजना व सुविधांची माहिती सर्व बसगाड्या आतून बाहेरुन साफ करण्यात येणार आहे. या दिवसाचे आगळे वेगळे स्वरुप प्रवाशांना जाणवले पाहिजे, असे विविध उपक्रम राबविणार आहेत.
- गौतम शेंडे,
आगार व्यवस्थापक, साकोली

Web Title: Travelers will welcome the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.