हजारो मैलांचा प्रवास करून ‘श्याम कादंब’ भंडाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:31 PM2018-12-25T21:31:52+5:302018-12-25T21:32:15+5:30

परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

Traveling thousands of miles in the 'Shyam Kadamba' storehouse | हजारो मैलांचा प्रवास करून ‘श्याम कादंब’ भंडाऱ्यात

हजारो मैलांचा प्रवास करून ‘श्याम कादंब’ भंडाऱ्यात

Next
ठळक मुद्देपरदेशी पाहुणे पक्षी : तलावावरील जलविहार ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
श्याम कादंब हे पक्षी बलूचीस्थान, अझरबैजान, इराण, पाकीस्तान, बांगलादेश आणि पूर्वेकडे असलेल्या चीन सीमेलगतच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडून अन्नाच्या शोधात स्थलांतर करून भारतात येत असतात. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी डेरेदाखल होतात.
या पक्ष्यांची चोच गुलाबी रंगाची असून आकाराने हे मोठे असतात. या पक्ष्यांची लांबी ७४ ते ९१ सेंटीमीटरपर्यंत असते. यांचे सरासरी वजन तीन ते साडेतीन किलोपर्यंत असते. जगभरात त्यांचे अस्तित्व युरोप आणि आशियाच्या पर्वतरांगांच्या मध्यंतरी दिसून येते. हे पक्षी उबदार ठिकाणी वास्तव्यासाठी दक्षिणेकडे प्रवास करीत असतात.
प्राचीन ग्रीस आणि रोम मध्ये ते प्रेमाची देवी ‘अ‍ॅफ्रोडाईट’ म्हणून संबोधित केले जाते. ‘पट्टकादंब’ (बार हेडेड गुज) आणि इतर परदेशी पक्षी हिवाळ्यात नागपूरसह परिसरात दरवर्षी येत असतात. परंतु मागील तीन वर्षात श्याम कादंब या पक्ष्यांची संख्या ५० पेक्षा जास्त दिसून आली.
भंडारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत पहिल्यांदाच या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्षी प्रेमी आणि व्यवसायाने दंतरोग चिकित्सक असलेले डॉ.स्वप्नील धारगावे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हिवाळ्यातील तापमानात दरवर्षी होत जाणाºया वाढीमुळे या पक्ष्यांचे आगमन रोडावले आहे. परंतु असे असतानाही भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने त्यांचे आगमन होणे ही चांगली बाब आहे.
दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, पृथ्वीचे वाढते तापमान या दोन गोष्टींमुळे पर्यावरणात असमतोल निर्माण होऊन त्याचा प्रभाव भूमंडलीय वातावरणात होत आहे. परिणामी उष्णता वाढत असल्याने हिमालयावरील बर्फही मोठ्या प्रमाणात वितळत असते. समुद्राची पातळी किंचित का असेना वाढत असली तरी याचा परिणाम पशुपक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचेच उदाहरण म्हणजे श्याम कादंब होय. वातावरणाच्या शोधात हे पक्षी स्थलांतर होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे जीभेची चोचले पुरविण्यासाठी या पक्ष्यांची शिकारही केली जाते. सदर पक्ष्यांच्या शिकारींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पक्षी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. यावर वनविभागाने दिशानिर्देश देणे गरजेचे आहे.

Web Title: Traveling thousands of miles in the 'Shyam Kadamba' storehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.