वृक्ष लागवड, संवर्धन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:31+5:302021-07-13T04:08:31+5:30
राजकुमार गभने : जनता विद्यालयात वृक्षारोपण तुमसर : पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक असून, मानवास प्राणवायू देणाऱ्या झाडांचे ...
राजकुमार गभने : जनता विद्यालयात वृक्षारोपण
तुमसर : पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक असून, मानवास प्राणवायू देणाऱ्या झाडांचे संवर्धन व संगोपन करून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जनता जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार गभने यांनी केले.
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रजातीच्या झाडांचे रोपण मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक राठी, प्रा. विद्यानंद भगत, विज्ञान शिक्षक पंकज बोरकर, प्राध्यापक एन. टी. कापगते, अजय बोरकर सुधीर हिंगे, डोंगरे, गणेश चाचिरे, नितीन पाटील, शशिकला पटले, परशुरामकर, मोहन भोयर, गोपाले, मंदा गाढवे, राखी बिसेन, लीना मते, उर्मिला कटरे, मेश्राम, शिक्षकेतर कर्मचारी देशमुख बंडू गोपाले, लक्ष्मी बिन झाडे आदी उपस्थित होते.