कलावंतांना आश्रय देणारी झाडीपट्टी रंगभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:06 PM2019-02-11T23:06:17+5:302019-02-11T23:06:40+5:30
मराठी रंगभूमीने मुंबई-पुण्यापलिकडे होणाऱ्या वेगळ्या प्रयोगाची फारसी दखल घेतली नाही तरी हे प्रयोग इतके प्रामाणिक होते की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मराठी रंगभूमीला शक्य नाही. यात सगळ्यात पहिले नाव विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भुभागाची ओळख झाडीपट्टी रंगभूमी आहे. १५० वर्षाची परंपरा असलेल्या या परिसरात वर्षाला तीन हजारावर नाट्यप्रयोग होतात. पुण्या-मुंबईच्या लोक कलावंताना आश्रय देणारी श्रीमंत झाडीपट्टीची रंगभूमी होय.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मराठी रंगभूमीने मुंबई-पुण्यापलिकडे होणाऱ्या वेगळ्या प्रयोगाची फारसी दखल घेतली नाही तरी हे प्रयोग इतके प्रामाणिक होते की, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे मराठी रंगभूमीला शक्य नाही. यात सगळ्यात पहिले नाव विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भुभागाची ओळख झाडीपट्टी रंगभूमी आहे. १५० वर्षाची परंपरा असलेल्या या परिसरात वर्षाला तीन हजारावर नाट्यप्रयोग होतात. पुण्या-मुंबईच्या लोक कलावंताना आश्रय देणारी श्रीमंत झाडीपट्टीची रंगभूमी होय.
विदर्भाची शान आणि नाट्यकंपन्याची खाण म्हणजे झाडीपट्टीची रंगभूमी होय. याची सुरुवात लोककलांच्यामाध्यमातून झाली. पूर्वी गावागावांत दंडार, गोंधळ, अशा लोककला सादर व्हायच्या याची सुधारित आवृत्ती म्हणजे संगीत रंगभूमी होय. झाडीपट्टीचे ख्यातनाम नाट्यलेखक, दिग्दर्शक सदानंद बोरकर यांनी या रंगभूमीचा इतिहास मांडला. गावागावांत शंकरपट व्हायचे त्यानिमित्ताने नाटक हा लोकांचा आवडीचा विषय. शंकरपट आणि नाटक हे समीकरण आजही कायम आहे. झाडीपट्टीचे लोक कला व नाटकावर अतोनात प्रेम करतात. शेतकरी शेतमजूर नाटकासाठी जीव की प्राण ओवाळून टाकतात. साधारणत: ६०- ७० वर्षांपूर्वी गावागावांत नाट्यमंडळी होती. त्यांना गावातील मालगुजारांचा आश्रय असायचा. दिवसभर काम करुन आलेल्या श्रमाचा परिहार करण्यासाठी नाटके बसविली जायची. यादरम्यान बाहेरचे वाद्य कलावंत, गायक, पेंटर असे कलावंत गावात आणायचे. संगित स्वयंवर, सौभद्र, मत्स्यगंधा, एकच प्याला, कानोपात्रा अशी बहुतेक नाटक यशस्वीपणे सादर केली.
पुढे या नाटकांना व्यवसायीक रुप आले. नाटक करणाºया संस्था निर्माण झाल्या आणि याच संस्थांच्या माध्यमातून नाटक सादर होवू लागले. नाट्य संस्थाच्या नाटकांनीही झाडीपट्टीच समृध्दी वाढविली. विविध गावात नाट्यसंस्था उभ्या राहिल्या. देसाईगंज (वडसा) हे झाडीपट्टी रंगभूमीचे मुख्य केंद्र झाले आहे. केवळ देसाईगंज मध्ये ६० ते ७० नाट्य संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक कंपन्यांचे गावागावांत ७० ते ८० नाट्य प्रयोग होतात. यानुसार या कालावधीत ३ हजारांचा वर प्रयोग सादर केले जातात. शेतीचा हंगाम संपला की नाटकाचां हंगाम सुरु होतो. मराठी चित्रपट व मालिकांमधील पुण्या-मुंबईच्या कलावंताचा सहभाग वाढू लागला. प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीनुसार नाटकादरम्यान हंगामा नावाने कार्यक्रम होऊ लागले. या रंगभूमीद्वारे ५० कोटींचावर उलाढाल होत आहे.
कलावंतांना मिळाली ओळख
झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आपली कला सादर करणाºया अनेकांना महानगरात ओळख मिळाली. त्यात सदानंद बोरकर, अनिरुध्द वनकर, संजयकुमार, के. आत्माराम, डॉ. परशुराम, खुणे, हिरालाल पेंटर, प्रल्हाद मेश्राम, कमलाकर बोरकर, युवराज प्रधान, शेखर परके, किरपाल सयाम, राजा चिटणीस, ज्ञानेश्वरी कापगते, रागीनी बिडकर, भुमाला कुंभरे आणि असंख्य प्रतिभावंत नाट्य कलावंतांनी आपली सेवा दिली आहे.
पुणे-मुंबईच्या कलावंतांना भुरळ
झाडीपट्टी रंगभूमीचे केवळ स्थानिक कलावंतानाच नाही तर पुणे, मुंबईच्या चित्रपट सृष्टीतील कलावंताना भुरळ पाडली. लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकरांपासून मोहन जोशी, समीर दंडारे, अभिजीत काकडे व आताचा मकरंद अनाजपुरे यांनीही या रंगभूमीवर आपली कला सादर केली. ज्युनिअर दादा कोंडके, ज्युनिअर नाना पाटेकर यांचा या कालावधीत झाडीपट्टीत मुक्काम असायचा.