आदिवासी बांधवांचा कुणी वालीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:43 AM2017-10-08T00:43:14+5:302017-10-08T00:43:24+5:30
बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे.
राहूल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी प्रकल्पबाधित असलेल्या आदिवासीबहूल कमकासूर या गावाचे रामपूर येथे मागील ७ वर्षापुर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु पुनर्वसनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिथे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे. संपूर्ण आदिवासी बांधवांनी आपल्या गावातून दोन दिवसापुर्वी पलायन केले. परंतू एकही लोकप्रतिनिधी, अधिकाºयाने भेटही दिली नाही. त्यामुळे या आदिवासी बांधवांचा कुणी वाली आहे किवा नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
बावनथडी प्रकल्पबाधित कमकासूर येथील आदिवासी बांधवांना गाळभरणीच्या वेळेस गाव रिकामे करण्यासाठी प्रशासनाने आदिवासी बांधवांवर सक्ती केली होती. त्यामुळे ते भूमिहीन झाले. मात्र पुनर्वसनादरम्यान शेतीवर सोडा साध्या मुलभूत गरजा पुरविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी उपजिविकेचे साधन हिरावल्याल्याने बेरोजगारांची फौज निर्माण झाली. परिणामी उपासमारीचे संकट ओढवले. असे असताना प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही जाग आली नाही. त्यांचे जगणे मुश्किल झाले होते. त्यामुळे आता मरण आले तरी स्वगाव सोडायचे नाही, असा निर्धार करून ५ आॅक्टोबर रोजी आदिवासी बांधवांनी पुनर्वसित गावावरून मुळगावी लेकराबाळासह पलायन केले आहे. त्याठिकाणी वीजेची व्यवस्था नाही. संपूर्ण घरे पडलेले आहे. त्याठिकाणी गवत व पाणी साचलेले आहेत. घनदाट अरण्य असून तिथे रानटी प्राण्यांचा हैदोस आहे. अशा परिस्थितीतही आदिवासी बांधव लेकरबाळ व शेळ्या मेंढ्यासह टेंट उभारून दोन दिवसापासून भयग्रस्त वातावरणात जगत आहेत. प्रशासन किंवा लोकप्रतिनिधीला गरज नसल्यामुळे त्यांच्याकडून साधी विचारपुस करण्यात आली नाही.
निवडणुकीचे चिन्ह वाटप असल्यामुळे दुसºया दिवसी कमकासूर येथे भेट देऊन आलो. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी उपजिल्हाधिकारी दांडगे यांना आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात पाठविले. या बैठकीमध्ये सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
- गजेंद्र बालपांडे, तहसिलदार तुमसर.
आमच्या समस्येचे वास्तविक पाहण्याकरिता अधिकाºयांनी आमच्या मुळ गावी येऊनच चर्चा करावी. आम्ही कुठेही जाणार नाही.
-किशोर उईके, सरपंच कमकासूर