हौतात्म्य पत्करणाºया जवानांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:37 AM2017-10-22T00:37:43+5:302017-10-22T00:37:54+5:30
कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाºया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आॅक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाºया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आॅक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने आज पोलीस मुख्यालय भंडारा, येथील पोलीस हुतात्मा स्मृतीस्तंभ येथे सकाळी ८ वाजता श्रद्धांजली व शोक सलामीचे आयोजन करण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या उपस्थितीत प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) एस.टी. घुसर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी टिक्कस, तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळी हे उपस्थित होते.
यावेळी पोलीस अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपूर्ण भारतातून एकूण ३७० पोलीस अधिकाºयांनी - कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावीत असताना मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलिसांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच २१ आॅक्टोबर १९५९ रोजी लडाख हद्दीत भारत तिबेट सिमेवर १६ हजार फुट उंचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना हिंदी चिनी भाई भाई असा नारा लावणाºया चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सिमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्र असल्याची पर्वा न करता जवानांनी मातृभूमीसाठी प्राण पणाने लढून हौतात्म्य पत्करले. याच्यावर पोलीस इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडली त्या हॉट्रस्प्रिंग येथे या विरांचे स्मारक उभारले आहे. तेव्हापासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तेथे संपूर्ण भारतातील पोलिसांनी या विरांचे स्मारक उभारले आहेत.
सदर प्रसंगी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या शहीदाचे नावे उपविभागीय पोलीस अधिकारी टिक्कस, साळी यांनी वाचन केले. तसेच भंडारा जिल्ह्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी पोउपनि दिपक सखराम रहिले, पोहवा योगेश्वर तुकाराम हेडाऊ, पोशि शिवलाल सीताराम बरैय्या, पोशि दामोधर शंकर वडतकर, पोशि रविकुमार सेवकराम जौंजाळ, पोशि ईशांत कुमार रामरतन भुरे,पोशि भोजराज शंकर बाभरे, पोशि मुलचंद शामराव भोयर,पोशि मनोज शालीकराम गिºहेपुंजे, पोशिबीडी बांते जीडी, पोशि बालपांडे सीआरपीएफ यांच्या स्मृतींना ही उजाळा देण्यात आला. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील शहीद अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबिय कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच पोलीस बँड पथक यांनी शहरात चौकाचौकामध्ये राष्ट्रभक्तीपरगीतांच्या धून वाजवून श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस कर्मचाºयांच्या स्मृतींना उजाळा देवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.