‘एक दिया शहिदों के नाम’पर शहिदांना श्रध्दांजली
By admin | Published: November 2, 2016 12:45 AM2016-11-02T00:45:14+5:302016-11-02T00:45:14+5:30
देशाच्या सिमेवरील तैनात जवान आपल्या प्राणाची आहूती देवून देशाचे रक्षण करीत आहेत.
सैनिकांनी कथन केला थरार : मोहाडीवासीयांचा पुढाकार
भंडारा : देशाच्या सिमेवरील तैनात जवान आपल्या प्राणाची आहूती देवून देशाचे रक्षण करीत आहेत. स्वत:चे घर-परिवारापासून दूर राहून देशसेवा करताना अनेकांना वीर मरण आले. अशा शहिदांच्या आठवणीत प्र्रभाग क्रमांक एक मित्र परिवार तर्फे टिळक वॉर्ड मोहाडीच्या वतीने रविवार ३० आॅक्टोबरला रात्री ९ वाजता उमराव बोरकर यांच्या पटांगणावर एक दिया शहिदों के नाम श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यातआला.
यावेळी मोहाडीतील सैनिक या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. निलेश मेहर या सैनिकाने (सियाचीन) इथली परिस्थिती सांगितली. भारतीय सीमेवरचे सैनिकांचे अनुभव यावेळेस सांगितले. यावेळेस क्रिष्णा बाभरे या सैनिकांनी (कुंपवाडा) येथील परिस्थितीचा अनुभव सांगितला. परिसरात भावुक वातावरण झाले होते. सैनिक हा आपले जवीन सीमेवर कशा प्रकारे अर्पण करत असतो याचे ज्वलंत उदाहरण सुद्धा सांगितले.
यावेळी निलेश मेहर, क्रिष्णा बाभरे येथे कार्यरत असलेले रोहित चिंधालोरे, सेवानिवृत्त सैनिक पृथ्वीराज उईके, यशवंत थोटे, नरेंद्र निमकर, अशोक बावनकर, संतोष समरीत, रोहित पडोळे, सचिन कुंभलकर, राकेश बावनकर, ओमकार बावनकर, गणेश पराते, रणजित समरीत, दिनेश कुंभलकर, प्रशांत देशमुख, जयंत जिभकाटे, श्याम बांडेबुचे, हेमंत जिभकाटे, राजेश सेलोकर, अरामन बरबट, सुगंधा देशमुख, नलिनी बावनकर, मिनाक्षी मोहतुरे, विद्या कुंभलकर, इंदिरा समरीत, श्रद्धा देशमुख, रोशना बावनकर, भावना पडोळे, कुंदा समरीत, रजनी बांडेबुचे, प्रणाली फुले, यशोदा पडोळे, ममता समरीत, मिरा कुंभलकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नागसेन फुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन तेजस मोहतुरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)