लाखनी येथे काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:40+5:302021-08-12T04:40:40+5:30
*प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव लालजी मिश्रा यांची उपस्थिती* लाखनी : भंडारा ...
*प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव लालजी मिश्रा यांची उपस्थिती*
लाखनी : भंडारा जिल्हा काँग्रेस सेवादल व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "व्यर्थ न हो बलिदान" महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने घेण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाचा एक भाग म्हणूनच तिरंगा पदयात्रा लाखनी येथे काढण्यात आली. या पदयात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले, भंडाराचे पालकमंत्री विश्वजित कदम, पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार दिलीप बन्सोड, महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाचे प्रभारीलाल मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष हाजी कलाम, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, अरविंद कारेमोरे, शफीभाई लद्धानी, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, डॉक्टर सेलचे अध्यक्ष चंद्रकांत निंबार्ते, सविता ब्राम्हणकर, धनंजय तिरपुडे, काँग्रेस पक्षाचे लाखनी तालुका अध्यक्ष राजू निर्वाण, साकोली तालुकाध्यक्ष होमराज पाटील कापगते, लाखांदूर तालुकाध्यक्ष वासुदेव तोंडरे, भंडारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, पवनी तालुकाध्यक्ष शंकर तेलमासरे, तुमसर तालुकाध्यक्ष शंकर राऊत, मोहाडी तालुकाध्यक्ष राजेश हटवार, सेवादल शहर अध्यक्ष अनिल बावनकुळे, मार्तण्ड भेंडारकर, सोशल मीडीया विभाग जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघाये, युवक काँग्रेसचे मोहन निर्वाण, योगेश गायधने, महेश वनवे, कैलास लुटे, पिंटू खंडाईत, लालू गायधनी, हरगोविंद भेंडारकर, उत्तम भागडकर, इंटकच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा धनजोडे, जिल्हा काँग्रेसच्या सचिव प्रिया खंडारे, मीनाक्षी बोपचे, छाया पटले आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधी लाईन येथील जुनी बाजार समिती परिसरातून तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली तर गांधी विद्यालय लाखनी याठिकाणी या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. समारोपप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी देश उभाण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान असून हे योगदान विसरता येण्यासारखे नाही. ज्या पद्धतीने गेली सात वर्षे देशात विद्यमान केंद्र सरकारचा उपक्रम सगळे काही विकण्याचा सुरू आहे ते बघून अतिशय वाईट वाटते, काँग्रेस पक्षाने या देशात संस्था, कारखाने आणि जनसामान्यांच्या सुविधांसाठी अनेक गोष्टी केल्या असून त्याच गोष्टी विकण्याचा आणि खाजगीकरणाचा सपाटा या केंद्र सरकारने लावला आहे, कठीन परिस्थितीतही काँग्रेस कायम जनतेसोबत सोबत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस सेवादल प्रभारीलाल मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.
100821\img-20210810-wa0105.jpg
photo