भरधाव ट्रकने म्हशीचा कळप चिरडला, चार ठार, सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:47+5:30

आंतरराज्यीय महामार्गावरून मध्यप्रेदशातून भरधाव ट्रक (क्रमांक एमएच ४० एके ३८) येत होता. नाकाडोंगरी ते राजापूर दरम्यान शिवमंदिराजवळील वळणावर म्हशीच्या कळपात हा ट्रक शिरला. म्हशींना चिरडत ट्रक पुढे गेला. त्यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता. या घटनेची माहिती होताच गावकरी घटनास्थळी धावून गेले.

Truck crush buffalo, four killed, six serious | भरधाव ट्रकने म्हशीचा कळप चिरडला, चार ठार, सहा गंभीर

भरधाव ट्रकने म्हशीचा कळप चिरडला, चार ठार, सहा गंभीर

Next
ठळक मुद्देनाकाडोंगरची घटना : घटनास्थळी ट्रक सोडून चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाकाडोंगरी : भरधाव ट्रकने रस्त्याने जाणारा म्हशीचा कळप चिरडल्याची घटना तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते राजापूर वळणावर शुक्रवारी दुपारी घडली. या धडकेत चार म्हशी जागीच ठार तर सहा म्हशी गंभीर जखमी झाल्या. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता. या घटनेनंतर चालक ट्रक घटनास्थळावर सोडून पसार झाला.
आंतरराज्यीय महामार्गावरून मध्यप्रेदशातून भरधाव ट्रक (क्रमांक एमएच ४० एके ३८) येत होता. नाकाडोंगरी ते राजापूर दरम्यान शिवमंदिराजवळील वळणावर म्हशीच्या कळपात हा ट्रक शिरला. म्हशींना चिरडत ट्रक पुढे गेला. त्यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता. या घटनेची माहिती होताच गावकरी घटनास्थळी धावून गेले. हा प्रकार पाहून ट्रकचालक घटनास्थळीच ट्रक सोडून पसार झाला.
या अपघातात शेतकरी गिरीधारी वाघमारे, कंठीराम वाघमारे, कचरू गहाणे, पांडूरंग गौपाले, गजानन वाघमारे, यदुनाथ परबते, ब्रीजलाल परबते, विवेकानंद परबते यांचे मोठे नुकसान झाले.
या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतप्त गावकऱ्यांचा रस्ता रोको
अपघातात म्हशी ठार झाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आंतरराज्यीय महामार्गावर दुपारी ३ वाजतापासून चक्का जांब आंदोलन सुरू केले. यामुळे दोनही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमीका घेतली होती. वृत्त लिहिस्तोवर गावकरी महामार्गावर ठिय्या देवून बसले होते. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Web Title: Truck crush buffalo, four killed, six serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.