ट्रकच्या धडकेत वाहनचालकाचा मृत्यू

By admin | Published: November 27, 2015 12:48 AM2015-11-27T00:48:14+5:302015-11-27T00:48:14+5:30

चारचाकी वाहनातून घराकडे जाणाऱ्याला विरूध्द दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली.

Truck driver dies in truck crash | ट्रकच्या धडकेत वाहनचालकाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत वाहनचालकाचा मृत्यू

Next

हलदारपुरी येथील घटना : ट्रकचालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
भंडारा : चारचाकी वाहनातून घराकडे जाणाऱ्याला विरूध्द दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात वाहनचालकाचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील हलधरपुरीजवळ मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुधिर रामचंद्र कळंबे (२९) रा. रामनगर, भंडारा असे मृतकाचे नाव आहे. मृतक सुधिर हा शहरातील पांढराबोडी मार्गावरील रामनगर येथे पत्नी, आई-वडील, भाऊ यांच्यासह राहत होता. घटनेच्या वेळी तो त्याच्या आईच्या नावे असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३१ डीबी २०९४ ने घराकडे जात होता.
हलधरपुरीजवळ पोहचला असता आंधळगाव येथील ट्रक क्रमांक सीजी ०४ एफडी ४८०२ मध्ये तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान भरून गडचिरोली जिल्ह्यातील वडसाकडे जाणाऱ्या या भरधाव ट्रक च्या चालकाने चारचाकी वाहनाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात वाहनातील सुधिरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा होवून ती रस्त्यालगत असलेल्या एका घरात शिरली. दरम्यान अपघाताची भीषणता लक्षात येताच वॉर्डातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, भीषण अपघातामुळे सुधिर गाडीत फसला होता. दरम्यान डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी चारचाकी वाहनाचे पत्रे कापून त्याला बाहेर काढण्यात आले.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी ट्रकचालक उमेश बोरकर (३२) रा. आंधळगांव याच्याविरूध्द भादंवी २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. ट्रकचालकाला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या घटनेचा तपास भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओ. एन. केवट करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Truck driver dies in truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.