भीषण अपघातात ट्रक चालक ठार
By admin | Published: June 7, 2017 12:25 AM2017-06-07T00:25:43+5:302017-06-07T00:25:43+5:30
भरधाव जाणाऱ्या दोन ट्रकमध्ये आमोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक ट्रकचालक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास पलाडी जवळ घडली.
पलाडीजवळील घटना : दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव जाणाऱ्या दोन ट्रकमध्ये आमोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक ट्रकचालक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास पलाडी जवळ घडली.
निरज यादव (२७) नवीन नगर पारडी नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तर अतुल प्रभाकर भिमटे रा.वलगाव जि. अमरावती असे जखमी चालकाचे नाव आहे. सीजी ०४ बीए ११३५ हा ट्रक रायपूर येथून नागपूरकडे जात होता. तर एमएच २७ एफ ६२६५ हा ट्रक अमरावती येथून रायपूरकडे निघाला होता. या दोन्ही भरधाव ट्रकची भंडारा तालुक्यातील पलाडी जवळ भीषण धडक बसली. यात निरज यादव व अतुल भिमटे हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दोन्ही ट्रकच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. यामुळे दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. दरम्यान निरज यादवचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी अतुल भिमटेवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कारधा पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा नोंदविला आहे.घटनेचा अधिक तपास ठाणेदार इंगोले करीत आहेत.
केव्हा होणार उड्डाणपुल ?
मुजबी ते सिंगोरी या १३ कि.मी.च्या मार्गावर उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले असले तरी या कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहरात आणि जिल्ह्यात दररोज अपघाताच्या घटना वाढत आहे. भरधाव वाहनांमुळे हे अपघात होत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक पोलिसांना नियुक्त करणे गरजेचे आहे.