ट्रक - कंटेनर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:02 PM2017-08-23T22:02:06+5:302017-08-23T22:02:32+5:30

भरधाव जाणाºया ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रकची दिशा बदलली.

Truck - One killed in container crash | ट्रक - कंटेनर अपघातात एक ठार

ट्रक - कंटेनर अपघातात एक ठार

Next
ठळक मुद्देकारधा नाक्यावर अपघात : दीड तास वाहतूक खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव जाणाºया ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रकची दिशा बदलली. यात विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनरची ट्रकला जबर धडक बसली. या विचित्र अपघातात एक ठार झाला असून एक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कारधा नाका चौकात घडली.
ट्रक क्रमांक सी.जी. ०७ ए.एक्स. ९०१४ व कंटेनर क्रमांक एन.एल. ०२ एल ३९४८ अशी अपघातग्रस्त वाहनांचे क्रमांक आहेत. या अपघातात ठार झालेल्या व जखमींची वृत्त लिहिपर्यंत ओळख पटली नसल्याने नावे कळू शकली नाही.
कंटेनर हा लाखनीकडून नागपुरकडे निघाला होता. दरम्यान कारधा नाका चौकात कंटेनर चालकाने ब्रेक लावले. त्यामुळे नागपुरच्या दिशेने जाणारा कंटेनर हा कारधा गावाच्या दिशेने वळला. याचवेळी नागपुरकडून येणाºया ट्रक चालकाचे वाहनावर नियंत्रण न राहिल्याने कंटेनरवर जबर धडकला. या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी झाला.
घटनेची माहिती कारधा पोलिसांना होताच ठाणेदार आर.के. मानकर हे पथकासह तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. दरम्यान चौकातील वाहतूक खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहनातून मृतक व जखमीला बाहेर काढून पोलिसांनी तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान सुमारे दीड तास चौकातील वाहतूक खोळंबली होती. कारधा पोलिसांनी वाहतूक पोलीस शाखेच्या मदतीने ती पूर्ववत केली. याप्रकरणी मृतकाची व जखमीची ओळख पटलेली नसून पुढील तपास हवालदार बहादुरे करीत आहेत.
चौरस्ता ठरतोय कर्दनकाळ
कारधास्थित टोल नाक्यानजीक असलेल्या चौरस्त्यावर यापूर्वी अनेकदा अपघात घडलेले आहेत. अपघात घडू नये यासाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

Web Title: Truck - One killed in container crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.