जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:16+5:302021-06-10T04:24:16+5:30
पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनेवरून बुधवारी सकाळी ८.३० वाजता सेंदुरवाफा येथील टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. छत्तीसगड राज्यातील रायपूरकडून ...
पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनेवरून बुधवारी सकाळी ८.३० वाजता सेंदुरवाफा येथील टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. छत्तीसगड राज्यातील रायपूरकडून येत असलेला ट्रकची (क्रमांक एमएच-४० बीजी-७०६४) तपासणी केली. त्यामध्ये २७ जनावरे निर्दयतेने कोंबून भरलेली आढळली. ही जनावरे कामठी येथील कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी ट्रक जप्त करून जनावरांची रवानगी बरडकिन्ही येथील गौशाळेत केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वाहनचालक आसीफ मोहसीन कुरेशी (२९), रा. नागपूर, नीलेश राबिल्सन मसी (२९), सुभाष सुलेमान मसी (२८), दोघे रा. विसामपूर, छत्तीसगड, जनावर मालक बृजेश शंभू नाथ शुक्ला ऊर्फ बंटी शुक्ला, रा. लष्करीबाग नागपूर, घनश्याम मदन पाल ऊर्फ सोनू डवका, रा. नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्यासह गडेगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक अमित पांडे, वाहतूक शिपाई स्वप्नील गोस्वामी यांच्या चमूने केली.