ट्रकची खांबाला धडक विजेच्या तारा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:08 PM2018-06-24T22:08:38+5:302018-06-24T22:08:58+5:30
रस्त्यावरून ट्रक फिरविताना मागे असलेल्या विजेच्या खांबाचा चालकाला अंदाज न आल्यामुळे या ट्रकची खांबाला धडक लागली. यात सिमेंटचा खांब तुटून पडला. खांब तुटताच विजेच्या जिवंत तारा रस्त्यावर पडल्या. दरम्यान, आज गणेशपूरचा आठवडी बाजार असल्यामुळे या मार्गावर दररोजपेक्षा वर्दळ अधिक होती. या तारा कुणावर पडल्या असत्या तर मोठी हानी झाली असती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रस्त्यावरून ट्रक फिरविताना मागे असलेल्या विजेच्या खांबाचा चालकाला अंदाज न आल्यामुळे या ट्रकची खांबाला धडक लागली. यात सिमेंटचा खांब तुटून पडला. खांब तुटताच विजेच्या जिवंत तारा रस्त्यावर पडल्या. दरम्यान, आज गणेशपूरचा आठवडी बाजार असल्यामुळे या मार्गावर दररोजपेक्षा वर्दळ अधिक होती. या तारा कुणावर पडल्या असत्या तर मोठी हानी झाली असती.
रविवारला सकाळी ११ वाजता सामान भरलेला एक ट्रक गणेशपुरात जात होता. दरम्यान, हा ट्रक फिरविताना चालकाला मागील बाजुला असलेल्या खांबाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रकची मागेहून खांबाला जोरदार धडक लागली. त्यानंतर हा सिमेंटचा हा खांब मधातूनच तुटला आणि जिवंत तारा जमिनीवर पडल्या.
दरम्यान, त्या परिसरात जमिनीवर बसलेल्या एका मांस विक्रेत्याच्या दुकानावर या तारा कोसळल्या. त्यावेळी त्या दुकानात ग्राहक नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा सुरू होती.
पाच तास वीज ठप्प
ट्रकची खांबाला धडक लागून वीज तारा जमिनीवर कोसळल्या. त्यानंतरही वीज पुरवठा सुरूच होता. जिवंत तारा रस्त्यावर आणि वाहतूक सुरूच होती. याची माहिती वीज वितरण विभागाला दिल्यानंतर लाईनमन येऊन ट्रान्सफार्मरवरून वीज पुरवठा खंडित केला. दरम्यान, गणेशपूर परिसरात सकाळी ११.३० ते ४.३० पर्यंत पाच तास वीज पुरवठा ठप्प होता.
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही तारा रस्त्यावर पडून होत्या. तरीही या मार्गाने वाहतूक सुरूच होती. आवागमन करणाऱ्या लोकांना या तारा दिसत नसल्यामुळे घटना स्थळाच्या बाजुला असलेल्या मेहर बंधूनी रस्त्याने ये-जा करणाºया लोकांना वीज तारा रस्त्यावर पडून असल्याची सूचना देत सतर्क करीत होते. त्यानंतर दुपारी १ वाजतानंतर नवीन खांब लावण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली.