योगाप्रति जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:26 AM2019-06-22T01:26:30+5:302019-06-22T01:26:52+5:30
निरामय आयुष्यासाठी योगा हे रामबान औषध आहे. त्यासाठीच योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा शहरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निरामय आयुष्यासाठी योगा हे रामबान औषध आहे. त्यासाठीच योगाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी भंडारा शहरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, जे.एम. पटले महाविद्यालय, पतंजलि योग समिती, आय.एन.ओ., जिल्हा आरोग्य संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिनाच सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, भारत स्वाभीमान नॅसचे जिल्हा प्रभारी रामविलास सारडा, पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर, आय.एम.ओ. समावेक डॉ. भगवान मस्के, डॉ. कार्तिक पनीकर, डॉ. राजेंद्र शहा, डॉ. भीमराव पवार, डॉ. प्रशांत माणूसमारे, प्रा. रूपमेश मोहतुरे आणि जिल्हाधिकाऱ्यांचा परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला रोपटे देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. रमेश खोब्रागडे, कांचन ठाकरे, स्रेहल तिडके, भोजराज झंझाळ यांनी योगाच ेप्रात्यक्षिक सादर केले. जिल्हाधिकारी शांतनू गोलय यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात ग्रिना, चालन, स्कंध चालन, स्कंद चक्र, कटी चालान, खुटना संचालन, ताडसन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोनासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, मरीचासन, भुजंगासन, सेतुबंधासन, उत्तानपादासन, अर्धहस्तासन, पवनमुक्तासन, श्वासन, अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी प्राणायाम, शितली प्राणायाम आदींचा अभ्यास करण्यात आला. संत शिवराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगावर आधारित गीत सादर केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रीडा विभागांतर्गत जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुल लाखांदूर, लाखनी, साकोली, पवनी, तुमसर व मोहाडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरस्कोल्हे यांनी मानले. यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी महेश पडोळे, भोजराज चौधरी, मंगेश कुडवे आदींनी सहकार्य केले.
रुग्णालयात योगा
आयुषू विभाग व राष्ट्रीय अभियानाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. सुनिता बडे आदी उपस्थित होते.