रिपाइं ऐक्यापूर्वी आघाडीसाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:59 PM2018-02-23T22:59:23+5:302018-02-23T22:59:23+5:30
रिपब्लिकन पाटीर्तील पूवीर्चे नेते आता वेगवेगळ्या गटात विखुरलेले आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : रिपब्लिकन पाटीर्तील पूवीर्चे नेते आता वेगवेगळ्या गटात विखुरलेले आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यापूर्वी आंबेडकरवादी नेत्यांची आघाडी व्हावी याकरिता आपण प्रयत्न करणार आहे. यापुढे येणाºया सर्वच निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे रिपाइंचे जनरल सेक्रेटरी डॉ.राजेंद्र गवई यांनी पत्रपरिषदे सांगितले.
भंडारा येथे रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी डॉ.गवई म्हणाले, प्रमुख राजकीय पक्ष हे सर्वच निवडणुकीत आंबेडकरी जनतेची मते मिळवण्यासाठी गटगटातील नेत्यांसोबत बोलणी करतात आणि कमी जागा देतात. त्यामुळे रिपाइंचे आतापर्यंत नुकसान होत आले आहे. आज आपसातील मतभेदामुळे दबावगट तयार करता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर पात्र उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले आहे. यापुढे रिपाइंचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावरच लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता बाबासाहेबांच्या रिपार्इंची ताकद वाढविणे हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरेगावभीमा प्रकरणात ३८ जणांना अटक झाली असून हजारो निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल केलेले आहे. त्यांना अद्याप जामिनही मिळालेला नाही. त्यामुळे या युवकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. या युवकांसाठी आम्ही कोणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आंबेडकरवादी नेत्यांनी आपसात बोलून दबावगट तयार करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्वतंत्र विदर्भ, विविध प्रवर्गाचे आरक्षण आदी अनेक विषयांवर आमचा पक्ष काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, नागपूरचे अध्यक्ष प्रकाश कुंभे, प्रदेश उपाध्यक्ष गोकूल पांडे, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य वसंतराव हुमणे, जिल्हाध्यक्ष मदन बागडे उपस्थित होते.