प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:39+5:302021-02-11T04:37:39+5:30

भंडारा : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत घरकूल योजना राबविली जाते, तरीही शेकडो गरीब कुटुंबे बेघर आहेत. बेघर ...

Trying to fulfill everyone's dream of a home | प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न

प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न

Next

भंडारा : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत घरकूल योजना राबविली जाते, तरीही शेकडो गरीब कुटुंबे बेघर आहेत. बेघर असलेल्या प्रत्येक कुटुंबाचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी आण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

भंडारा तालुक्यातील खमारी येथे आयोजित घरकूल प्रमाणपत्र वाटप व कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अक्षय पोयाम, खंडविकास अधिकारी नूतन सावंत, कारधाचे ठाणेदार दीपक वानखेडे, शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने, युवासेना विधानसभा प्रमुख आशिष चवडे, खमारीचे सरपंच सुरेश शेंडे, उपसरपंच राजू मोटघरे, कारधाचे सरपंच आरजू मेश्राम, सुरेवाडाचे सरपंच राघोर्ते, आमगावचे सरपंच वैभव सार्वे, मंडनगावचे सरपंच प्रभू फेंडर उपस्थित होते. खमारी, आमगाव, धारगाव, सिल्ली व पहेला जिल्हा परिषद क्षेत्रातील घरकूल लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप व कोरोना योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. संचालन फेंडर गुरुजी यांनी, प्रास्ताविक रामु बेदरकर यांनी केले, तर आभार खमारीचे तलाठी भुरे यांनी मानले. आयोजनासाठी गंगाधर मारवडे, निरज तुम्मे, लक्ष्मन उइके, खुशाल शेंडे, गणेश गाढवे, राजन कनोजे, किसन मेश्राम, काशिनाथ हातझाडे, गोविंदा गजभिये, भूषण बोरकर, नामदेव निंबार्ते आदींनी सहकार्य केले.

Web Title: Trying to fulfill everyone's dream of a home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.