महिनाभरात शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:33 AM2017-07-20T00:33:15+5:302017-07-20T00:33:15+5:30
महिनाभरात प्रशासकीय मान्यता मिळवून भंडारा येथील नागरिकांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे, ....
पाणी प्रश्नावर चर्चा : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिनाभरात प्रशासकीय मान्यता मिळवून भंडारा येथील नागरिकांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी अनिल अढागडे यांनी माजी नगरसेवक व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेप्रसंगी दिले.
दूषित पिण्याच्या पाण्याची व पाणी टंचाईची समस्या सोडवून कायमस्वरुपी उपाययोजना करा तसेच नागनदी आणि इकॉर्निया पासून वैनगंगा नदीचे संरक्षण करा, अन्यथा दि.१९ जुलै पासून नगरपरिषदेसमोर भाकपचे नगरसेवक कॉ.हिवराज उके यांच्या नेतृत्वात जनआंदोलन करण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दि.१७ जुलैला हिवराज उके यांना बोलावून चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी त्यांना आश्वासन देऊन आंदोलन परत घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे दि. १९ जुलै चे आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्यात आले. भाकपच्या शिष्टमंडळासोबत सुमारे तासभर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी १०५ कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची नवीन योजना तयार करण्यात आली. त्यात १०० टक्के अनुदान आहे. नगर परीषदेचा १ टक्के १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून भरला जाईल.
तसेच येत्या महिनाभरात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात येईल. तसेच शहरातील काही भागात विशेषत: "स्लम" एरियात ४-५ ठिकाणी असे "प्लांट" लावून शुद्ध पाणी देण्यात येईल असे सांगण्यात आले. दूषित किंवा गढूळ पाणी येत असल्यास पाणी पुरवठा विभागात ८०८७१०७३२३ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी जेणेकरून त्यावर कारवाई करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल, असे तक्रारीसाठी टोल फ्री नंबरची मागणी केल्यानंतर सांगण्यात आले.
दिलेल्या आश्वासनानुसार भंडारा शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नागनदीच्या गटारगंगेपासून व इकॉर्नियापासून संरक्षण करण्यासाठी कारवाई न केल्यास भाकपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे हिवराज उके यांनी सांगितले.
चर्चेत नगराध्यक्ष सुनिल मेंढे, मुख्याधिकारी अनिल अढागळे, हिरालाल भेदे, प्रदीप पटेल तसेच शिष्टमंडळात हिवराज उके, सदानंद इलमे, मोहनलाल शिंगाडे, झुलनबाई नंदागवळी, हरिदास जांगडे तसेच प्रभाकर ठवरे व एस.एस. बोरकर यांचा समावेश होता.