राष्ट्रीय महामार्गावरील नाल्या घाण पाण्याने तुंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:17 PM2019-05-13T23:17:03+5:302019-05-13T23:17:16+5:30

लाखनी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील नाल्या घाण पाण्याने तुंबलेल्या आहेत. स्थानिक गांधी स्मारक समितीच्या परिसरात दुर्गंधी युक्त घाण पाणी साचले आहे. परिणामी जाणाऱ्या येणाºया लोकांना व परिसरातील व्यावसायीकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Tumbles with Nala dirty water on National Highway | राष्ट्रीय महामार्गावरील नाल्या घाण पाण्याने तुंबल्या

राष्ट्रीय महामार्गावरील नाल्या घाण पाण्याने तुंबल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : लाखनी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील नाल्या घाण पाण्याने तुंबलेल्या आहेत. स्थानिक गांधी स्मारक समितीच्या परिसरात दुर्गंधी युक्त घाण पाणी साचले आहे. परिणामी जाणाऱ्या येणाºया लोकांना व परिसरातील व्यावसायीकांना त्रास सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरणाचे काम गेल्या पाच वर्षापुर्वी अशोका बिल्डकॉनने पूर्ण केले होते. या लाखनी शहरातून जाणाºया रस्त्यावर जेएमसी कंपनीचे फ्लॉयओव्हरचे काम सुरू असल्याने रस्त्यांचे हक्क जेएमसीकडे आले आहे. रस्ता रूंदीकरण व रस्त्याची सुरक्षितता आदी कामे जेएमसीकडे आहे. फ्लॉय ओव्हरचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व्हिस रोडवरील सुविधा उपलब्ध करून पार्किंगची सोय करणे, नाल्यातील गाळ उपसणे आदी कामे जेएमसी कडून होणे आवश्यक होते. त्याकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
स्थानिक व्यावसायीक कचरा सर्व्हिस रोडवर आणून टाकतात. याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नाल्यामधील गाळ उपसून नाल्यातील घाण पाणी प्रवाहित करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

नगरपंचायततर्फे जेएमसीला पत्र देवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्यातील गाळ उपसून नाल्या सफाई करण्याची सुचना दिल्या आहेत.
-ज्योती निखाडे,
नगराध्यक्ष, लाखनी.

Web Title: Tumbles with Nala dirty water on National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.