तुमसर-बपेरा मार्ग ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:17 PM2020-02-24T23:17:06+5:302020-02-24T23:17:34+5:30

तुमसर-बपेरा राज्यमार्गची गत काही दिवसापासून दुरवस्था झाली आहे. सिंदपुरी गावाचे शेजारी असणाऱ्या या मार्गावर जीवघेणे खड्डे तयार झाल्याने खड्डे चुकवत प्रवास करताना वाहनधारकांना अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. या राज्यमार्गाची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असली तरी मार्ग पुर्णत: दुरुस्ती करण्यात येत नाही. बिनाखी ते दवेसर्रा गावापर्यंत राज्यमार्गाहून पायी चालणे मुश्किल झाले आहे.

Tumor-bapara way is becoming fatal | तुमसर-बपेरा मार्ग ठरतोय जीवघेणा

तुमसर-बपेरा मार्ग ठरतोय जीवघेणा

Next
ठळक मुद्देअपघातात वाढ : परिसरातील वाहनधारक संतप्त, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर- बपेरा राज्यमार्गासह सिहोरा परिसरात असलेल्या रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. रात्री यामार्गाने प्रवास करताना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याची त्वरीत दुरुस्ती न झाल्यास परिसरातील नागरिकांनी आंंदोलनाचा इशारा दिला आहे.
तुमसर-बपेरा राज्यमार्गची गत काही दिवसापासून दुरवस्था झाली आहे. सिंदपुरी गावाचे शेजारी असणाऱ्या या मार्गावर जीवघेणे खड्डे तयार झाल्याने खड्डे चुकवत प्रवास करताना वाहनधारकांना अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. या राज्यमार्गाची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असली तरी मार्ग पुर्णत: दुरुस्ती करण्यात येत नाही. बिनाखी ते दवेसर्रा गावापर्यंत राज्यमार्गाहून पायी चालणे मुश्किल झाले आहे. तीन वितरण कंपनी कार्यालयासमोर राज्य मार्ग दोन भागात विभागला आहे. यामुळे भरधाव वाहनाचे अपघात वाढले आहेत. रात्री होणाऱ्या अपघाताची तर मालिकाच सुरु झाली आहे. या राज्यमार्गावर वळण झुडपाचे मोठे आच्छादन पसरले आहे. वळन मार्ग स्वच्छ करण्यात न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
सिहोरा ते गोबरवाही मार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या मार्गावर अनेक गावाचे वास्तव्य असून वर्दळ जास्त राहते. परंतु मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. सिहोरा ते टेमनी गावांना जोडणाºया रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या मार्गाने चांदपुरात भाविक दर्शनाकरिता ये-जा करीत आहेत. मुरली ते चांदपुर, सोंड्या ते टेमनी, मोहाडी, खापा, बिनाखी ते गोंडीटोला, बिनाखी ते ब्राम्हणटोला या गावातील नागरिकांना प्रवास करणे मोठे कसरतीचे काम झाले आहे. महालगाव फाटा ते नाकाडोंगरी गावाला जोडणाºया १८ किमी अंतराचे केलेले डांबरीकरण महिनाभरात उखडले आहे.
रस्ते दुरुस्तीसाठी आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर रहांगडाले, मुरलीचे सरपंच राजेश बारमाटे, वाहनीचे सरपंच गळीराम बांडेबुचे, देवानंद लंजे, अंबादास कानतोडे, सुनील मेश्राम यांनी दिला आहे.

Web Title: Tumor-bapara way is becoming fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.