कोरोना संकटात तुमसरच्या २९ तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:49+5:30

सध्या देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. सर्वत्र संचारबंदी असून व्यवहार ठप्प पडले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. वेळेवर रक्त उपलब्ध होण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुमसर येथील नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेने या शिबिराचे आयोजन केले होते.

 Tumors' donors donated blood in Corona crisis | कोरोना संकटात तुमसरच्या २९ तरुणांनी केले रक्तदान

कोरोना संकटात तुमसरच्या २९ तरुणांनी केले रक्तदान

Next
ठळक मुद्देसामाजिक जाणीव : नवप्रतिभा युवा मंच, गेम चेंजर संघटना

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून अशा संकटाच्या काळात रक्तदान करण्यासाठी तुमसर येथील २९ तरुण पुढे सरसावले. नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेच्या वतीने येथील गभणे सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सध्या देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. सर्वत्र संचारबंदी असून व्यवहार ठप्प पडले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. वेळेवर रक्त उपलब्ध होण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुमसर येथील नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेने या शिबिराचे आयोजन केले होते.
आरोग्यविषय खबरदारी घेत रक्तदान करण्यात आले. प्रत्येकाने सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले. रक्त संकलनासाठी भंडारा येथील शासकीय रक्तपेढीच्या तज्ज्ञांसह डॉ.सचिन बाळबुद्धे, कल्याणी भुरे, अनिल गभणे, अजय अग्रवाल, संजय खंडेलवाल, तुषार बुरडे यांनी सहकार्य केले. शिबिराला पोलीस निरीक्षक राजेश्वर पिपरेवार, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, गणेश बर्वे, निलेश वासनिक, जवाहर कुंभलकर यांनी भेट दिली.

यांनी केले रक्तदान
यावेळी अजय अग्रवाल, बंटी भुरे, अजय तिवारी, दीपक शेंडे, गिरीश उमरकर, अमन कावळे, प्रमोद घरडे, संतोष हिंगे, मयूर खराबे, अजिंक्य क्षीरसागर, गिरीश निखाडे, हेमंत गिºहेपुंजे, मुकेश मलेवार, निलेश गौपाले, सूर्या ठवकर, गुलशन मेश्राम, मयूर नखाते, विवेक बोरकर, प्रवीण आस्वले, मयंक कापगते, रोहित सोमनाथे, अतुल चिंधालोरे, किशोर कापगते, अतुल मानकर, प्रफुल्ल आस्वले, वल्लभ चौधरी, अनुराग कुथे, तोषल बुरडे यांनी रक्तदान केले.

Web Title:  Tumors' donors donated blood in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.