तुमसरात ५० युवक-युवतींनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:08+5:302021-05-26T04:35:08+5:30
तुमसर: तुमसरसह जिल्हा स्तरावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना काळात संक्रमितांना रक्ताची मोठी गरज भासते. त्याकरिता टीम ...
तुमसर: तुमसरसह जिल्हा स्तरावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना काळात संक्रमितांना रक्ताची मोठी गरज भासते. त्याकरिता टीम तुमसरच्या युवकांनी एकत्र येऊन गभने सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यात ५० युवक-युवतींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
कोरोना संक्रमण काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
रक्तदान करण्याकरिता तुमसर येथील युवकांनी सोशल मीडियावर रक्तदात्यांना रक्तदान करण्याकरिता प्रेरित केले. त्या आव्हानाला तुमसर शहरातील युवक-युवतींनी मोठा प्रतिसाद दिला. त्यात ५० युवक-युवतींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात ४१ युनिट रक्त जमा करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात रक्तपेढीत जमा झालेल्या रक्तातील एक हिस्सा तुमसरकरिता राखीव ठेवण्याची सूचना सामाजिक कार्यकर्ते जय डोंगरे यांनी केली. रक्तदान शिबिराकरिता जय डोंगरे, अर्पित जयस्वाल, तोशल बुरडे, प्रदीप भरणेकर, आशिष जोशी, सुमित मल्लेवार, सभागृहाचे मालक गभने यांनी परिश्रम घेतले.