तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, ११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 05:21 AM2019-09-29T05:21:01+5:302019-09-29T05:21:36+5:30

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली.

Tumsar BJP MLA Charan Waghmare arrested | तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, ११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, ११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी

Next

भंडारा : तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने ११ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तुमसर येथे बांधकाम कामगार किट वितरणप्रसंगी आमदार वाघमारे व भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सदर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगासह विविध गुन्हे १८ सप्टेंबर रोजी तुमसर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आ. वाघमारे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात धडकले होते. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी पाच दिवसाचा अवधी मागून घेतला होता.
शनिवारी सकाळी तपास अधिकारी आमदार वाघमारे यांच्या खात रोडवरील निवासस्थानी धडकले. त्यांना ताब्यात घेऊन भंडारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले.

भंडारा कारागृहात रवानगी
समर्थकांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार वाघमारे यांनी त्यांना थांबवित जमीन घेण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी त्यांची रवानगी भंडारा कारागृहात केली.
 

Web Title: Tumsar BJP MLA Charan Waghmare arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.