तुमसर शहर व तालुक्यात १४ एप्रिलपासून दहा दिवस कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:33+5:302021-04-12T04:33:33+5:30
११ लोक ११ के तुमसर: शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आज पासून दोन दिवस अत्यावश्यक ...
११ लोक ११ के
तुमसर: शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आज पासून दोन दिवस अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहणार व दि १४ एप्रिलपासून पुढील दहा दिवसांसाठी लॉकडाऊन व कडक संचारबंदी लागू करण्याचा नगर पालिकेच्या दालनात झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत निर्णय घेण्यात आला. परिणामी शहरात १२ एप्रिल व १३ एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहणार असून १४ एप्रिलपासून कडक संचारबंदी करण्यात आली आहे. या संचारबंदीत रुग्णालये, औषध दुकाने आणि दूध वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला.
लॉकडाउनच्या काळात जर कुणीही नागरिक अतिआवश्यक कामाशिवाय बाहेर फिरतानी दिसले तर त्याचावर कड़क कार्रवाई करण्यात येईल .सदर बैठक नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने आमदार राजू कारेमोरे, तहसीलदार बाळासाहेब
तेळे, पोलिस निरीक्षक रामेश्वर पीपरेवार ,पीसआय करँगामी ,मुख्याधिकारी विजय देशमुख, डॉ. शेंडे,नायब तहसीलदार पाटील, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगड़े, नगरसेवक मेहताबसिंग ठाकूर, बाळा ठाकूर, शिवसेनेचे नितीन सेलोकर, राष्ट्रवादी कांग्रेसचे राजेश देशमुख, तुमसर शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी दिनेश नागापोता,सुरेश माधवानी,कन्हैया फुलवाधवा,योगेश रंगवानी,वसंत राउत,स्वप्निल मनगटे, लक्ष्मण हरगुणानी, चंदू थेर,शिव बोरकर, अनिल कारेमोरे, देवचंद टेम्भरे, प्रामुख्याने उपस्थित होते