तुमसर शहरात भर उन्हाळ्यात पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:37 AM2021-04-20T04:37:01+5:302021-04-20T04:37:01+5:30
तुमसर शहराला माडगी पंपावरून सुमारे १७ लाख लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येतो. एकूण २६ लाख लिटरचा दररोज पाणीपुरवठा ...
तुमसर शहराला माडगी पंपावरून सुमारे १७ लाख लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येतो. एकूण २६ लाख लिटरचा दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. तीन दिवसापूर्वी येथील मोटार जळाली. पर्यायी दुसरी मोटार लावण्यात आली ; परंतु ती सुरू करत असताना तिच्यात बिघाड झाला व तीही जळाली. त्या कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद पडला. सध्या केवळ कोस्टी येथील पंपावरुन सात ते आठ लाख लिटरचा पाणीपुरवठा सुरू आहे. जळालेल्या मोटारीची सध्या दुरुस्ती सुरू असून एक-दोन दिवसात अर्ध्या शहराला पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.
तुमसर शहराला दर रोज २६ लाख लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा बंद असलेल्या वॉर्डात सध्या नगरपालिका व काही नगरसेवक टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत.
कवलेवाडा येथील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू होणार
वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे तुमसर शहराला पाणीपुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी ४८ कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येत असून लवकरच तेथून सर्वांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आतापर्यंत ८० किलोमीटर पाईपलाईन घालण्यात आली असून २० व १३ किलोमीटर पाईपलाईनचे कामे शिल्लक आहे. या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सदर योजनेला काही अडथळा निर्माण झाला होता तो सुद्धा दूर करण्यात आला आहे.
माडगी पंपहाऊस येथील एका पाठोपाठ दोन मोटारी जळाल्याने अर्ध्या शहराचा मागील तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे.
कोट
येत्या एक-दोन दिवसात पूर्व पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. ज्या प्रभागात पाणीपुरवठा बंद आहे तिथे नगरपालिका व काही नगरसेवकांच्या टँकरने पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.
मेहताब सिंह ठाकूर पाणीपुरवठा सभापती, नगरपरिषद,तुमसर