तुमसर न.प. मध्ये कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 12:25 AM2017-01-08T00:25:07+5:302017-01-08T00:25:07+5:30
नगर परिषद येथील सफाई कामगार तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यात असंतोष होता.
तुमसर : नगर परिषद येथील सफाई कामगार तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यात असंतोष होता. वारंवार निवदने देवून समस्या प्रलंबित आहेत. परिणामी न.प.च्या कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना व अखिल भारतीय सफाई मजदुर कांग्रेस संघटनेने मागण्या मंजूर होईस्तव बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
सहाव्या वेतन आयोगाचे थकबाकी देणे, महागाई भत्ता फरक देय करणे, सफाई कामगारांना गणवेश, लांब बुट, हॅन्डग्लोज, रेनकोट व मेडिकल तपासणी करणे, पदोन्नती देणे, पाचव्या वेतन आयोगाचे थकबाकी देणे, रोजंदारी कर्मचारांचे मस्टर फरक देय, रिक्त पदावर कर्मचाऱ्यांना पदोन्नती लिपिकाचे पद भरती करणे मागण्याचा समावेश आहे. आंदोलनात मजदुर कांग्रेसचे अध्यक्ष कुमार रगडे, मोतीलाल रणसुरे, दौलत ढबाले, शालिक भोंडेकर, देवा तांडेकर, सोहन शेंदरे तर कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक कनोजे, नासीर अली सय्यद, जमिल शेख, सुनिल लांजेवार, निशिष शुक्ला, मोरेश्वर कापसे, देवेंद्र शेंदुरर्णिकर, गणेश मेहर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)