तुमसर पंचायत समिती सदस्य अधिकारांचे ‘पंख’ छाटले

By admin | Published: September 8, 2015 12:37 AM2015-09-08T00:37:51+5:302015-09-08T00:37:51+5:30

सहा हजारपेक्षा अधिक मतदारांचे नेतृत्व, विकास कामांची गावात बोंबाबोंब, यामुळे पंचायत समिती सदस्य हैराण झाली आहे.

The Tumsar Panchayat Samiti members hammered the 'wing' of the rights | तुमसर पंचायत समिती सदस्य अधिकारांचे ‘पंख’ छाटले

तुमसर पंचायत समिती सदस्य अधिकारांचे ‘पंख’ छाटले

Next

चुल्हाड (सिहोरा) : सहा हजारपेक्षा अधिक मतदारांचे नेतृत्व, विकास कामांची गावात बोंबाबोंब, यामुळे पंचायत समिती सदस्य हैराण झाली आहे. राज्य शासनाने त्यांचे अधिकाराचे पंख छाटल्याने चेहरे हिरमुसले आहेत. या संदर्भात ग्राम विकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे व्यापक अधिकाऱ्यांना कात्री लावण्यात आली आहे. शासन स्तरावर प्राप्त होणारे अनुदान थेट ग्रामपंचायतकडे वळते करण्यात येत असल्याने पंचायत समिती सदस्यांचे महत्व कमी होणार आहे. राज्य अंतर्गत या सदस्यांची संघटना कार्यरत नाही. या शिवाय सहा हजार पेक्षा अधिक नागरिकांचे नेतृत्व करीत असताना विधान परिषद निवडणुकीत या सदस्यांना मतदानाचे अधिकार नाहीत. याउलट ३ हजार नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील नगरसेवकांना या अधिकारात समावेश करण्यात आलेला आहे. हा अन्यायकारक निर्णय असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. पंचायत समिती सदस्यांना व्यापक अधिकार देण्यासाठी कुणी राज्यस्तरावर मांडणारेवाली नाही.
पंचायत समिती सदस्यांना क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येत नाही. यामुळे त्यांना वरिष्ठ लोकप्रतिनिधींना अजिजी करावी लागत आहे. दरम्यान गावात सदस्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडण्याची पाळी आली आहे. रस्ते, नाली, प्रवाशी, निवारे, सभामंडप, मंदिराचे जीर्णोद्धार, पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत, आपातकालीन मदत आदी कामाची मागणी या सदस्यांना नागरिक करीत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती स्तरावर असा स्वतंत्र निधी प्राप्त होत नसल्याने सदस्यांचे डोक्याला ताप आणणारे चित्र गावात निर्माण झाले आहे.
दरम्यान पंचायत समिती स्तरावर सदस्य शो पीस ठरणारे चित्र निर्माण झाले आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना देताना साधी विचारपूस करण्याचे अधिकारही या सदस्यांना राहिले नाहीत. ग्रामसभेतून निवड अर्जाचा पुरवठा तथा जिल्हा परिषद मधून मंजुरी असा योजना देताना प्रवास असल्याने पंचायत समिती सदस्य मध्यमवर्गीय समाजात वास्तव्याची भूमिका बजावत आहेत.
गावात विकास कामांचा भडीमार करण्यात ये असल्याने ना बाबा ना असा सूर पंचायत समिती सदस्यांकडून ऐकविला जात आहे. दरम्यान पंचायत समिती स्तरावर विकासाची तिजोरी रिकामी असल्याने महिला सदस्यांनी फेरफटका मारणेही टाळले आहे. विकास मुद्यांवर भांडायचे झाल्यास निधी कुणाला मागावे, या संभ्रमात सदस्य आहेत. यामुळे मासिक सभेत जनतेच्या विकासाचे मुद्दे चर्चेत येत नाही. फक्त मासिक भत्ता उचल करण्यासाठी पंचायत समितीत हजेरी लावण्याची वेळ या सदस्यांवर आली आहे.
विकास कामाचे नियोजनसह अनेक अधिकाऱ्यांच्या प्राप्तीसाठी सदस्यांचे शिष्टमंडळ राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. (वार्ताहर)

पंचायत समिती स्तरावर विकास निधी नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. गावकऱ्यांच्या रोषाला सदस्यांना बळी पडावे लागत आहे. अधिकारांसाठी सदस्यांचे शिष्टमंडळ मंत्र्यांची भेट घेणार आहे.
- हिरालाल नागपुरे
पं.स. सदस्य, तुमसर.

Web Title: The Tumsar Panchayat Samiti members hammered the 'wing' of the rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.