तुमसर रोड रेल्वे स्थानकात मातीचे ढिगारे, साहित्य पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:55 AM2019-06-02T00:55:58+5:302019-06-02T00:56:18+5:30
तुमसर रोड रेल्वे स्थानकात 'फुट वे ब्रीज'चे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. मागील महिनाभरापासून प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वर उंच मातीचे ढिगारे व लोखंडी साहित्य पडून आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील छत मागील महिन्याभरापूर्वी काढण्यात आले. भर उन्हात येथे रेल्वे प्रवाशांना उभे राहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकात 'फुट वे ब्रीज'चे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. मागील महिनाभरापासून प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वर उंच मातीचे ढिगारे व लोखंडी साहित्य पडून आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील छत मागील महिन्याभरापूर्वी काढण्यात आले. भर उन्हात येथे रेल्वे प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. साहित्य व मातीच्या ढिगाºयामुळे रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
दक्षिण पूर्व रेल्वेचे तुमसर रोड जंक्शन नागपूर विभागात महसूल मिळवून देणारे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवाशी ये जा करतात. येथे रेल्वे स्थानकावर जुना फुट वे ब्रीज आहे. त्याच्या शेजारी नवीन फुट वे ब्रीजचे बांधकाम रेल्वे प्रशासनाने सुमारे एक महिन्यापूर्वी हाती घेतले. याकरिता प्लॅटफार्म क्रमांक दोन व तीनवरील छत काढण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वेगाडीची भर उन्हात प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वर महाकाय मातीचे ढिगारे करून ठेवले आहेत. लोखंडी, लाकडी साहित्य अस्तव्यस्त पडून आहेत. मातीचा ढिगारा खचून येथे धोक्याची अधिक शक्यता आहे. फुटवे ब्रीजचे काम कागसवगतीने सुरु आहे. पाऊस पडल्यावर संपूर्ण माती रेल्वे स्थानकात व रेल्वे ट्रॅकवर वाहून जाण्याची भीती आहे.
तुमसर रोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवाशी ये जा करतात. स्थानकात मातीचे ढिगारे व साहित्य अस्तव्यस्त पडून आहेत. प्रवाशांच्या जीवाला येथे धोका निर्माण झाला आहे. स्थानकातील छत काढण्यात आले. त्या ठिकाणी पर्यायी हिरवे नेट लावण्याची गरज होती. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
- सुधाकर कारेमोरे,
उपजिल्हा प्रमुख, शिवसेना, तुमसर
रेल्वे प्रशासनाला पडला विसर
मातीचे ढिगारे अत्यंत उंच असून पलीकडचे येथे काहीच दिसत नाही. रेल्वेचा स्थापत्य अभियंत्याच्या निरीक्षणाखाली सदर बांधकाम सुरु आहे. किमान पावसाळ्यापूर्वी अधिक वेगात ही कामे पूर्ण करण्याची गरज आहे. सदर रेल्वे मार्गावरून अनेक वरिष्ठ अधिकारी ये-जा करतात. परंतु त्याबाबत कारवाई येथे शून्य दिसत आहे. सार्वजनिक तथा वर्दळीच्या स्थळी साहित्य पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. याचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे.