तुमसर तालुक्यात १७,९११ निराधार
By admin | Published: May 9, 2016 12:26 AM2016-05-09T00:26:19+5:302016-05-09T00:26:19+5:30
आयुष्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर आधार नसलेल्या महिला व पुरुषांना शासनाची संजय गांधी निराधार योजना लाभ देते.
लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ : नामंजूर ३२७, तर प्रलंबित २२३ प्रकरणे
तुमसर : आयुष्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर आधार नसलेल्या महिला व पुरुषांना शासनाची संजय गांधी निराधार योजना लाभ देते. तुमसर तालुक्यात या योजनेचे एकूण लाभार्थी १७९११ आहेत. यापैकी ७ मे पर्यंत केवळ २२३ प्रकरणे प्रलंबित आहेत.
केंद्र तथा राज्य शासनाची संजय गांधी निराधार योजना देशात राबविली जाते. प्रत्येक तालुक्यात शासकीय अधिकारी व शासन नियुक्त सदस्य व समितीमध्ये असतात. तालुक्यातील सर्वात मोठी योजना व समिती म्हणून योजनेला ओळखले जाते. तालुक्यातील गरीब व कुटूंबाचा आधार नसलेल्या महिला व पुरुषांना प्रति महिना ६०० रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून प्राप्त होते. तुमसर तालुक्यात मागील एकूण लाभार्थ्यांची संख्या १६,८६६ इतकी होती. नवनियुक्त समितीने प्रलंबित १५५५ प्रकरणापैकी १०४५ प्रकरणे मंजूर केले. यात ३२७ प्रकरणे नामंजूर करण्यात आले. २२३ प्रकरणे ७ मेपर्यंत प्रलंबित होती. तुमसर तालुक्यात सध्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १७,९११ इतकी आहे.
समितीचे अध्यक्ष मुन्ना पुंडे, पं.स. उपसभापती शेखर कोतपल्लीवार, गजानन निनावे, प्रकाश पारधी, गुरुदेव भोंडे, संतोष वैद्य, निर्मला कापसेसह इतर पाच सदस्यांचा समितीत समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)