तुमसर तालुक्यात 23 टक्के पालकांनीच दिले संमतीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:00 AM2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:00:52+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात नऊ ते बारावी असे वर्ग भरण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील शाळा प्रशासनाने शाळा सुरू केल्या. परंतु त्यास पालकांच्या अल्प प्रतिसाद मिळत आहे. वर्ग ८ ते १२ मध्ये एकूण विद्यार्थी संख्या १२ हजार ७०३आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शालेय शिक्षण विभागाने वर्ग ९ ते १२ सुरू करण्याचे २३ नोव्हेंबर पासून आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती पत्र आवश्यक केले आहे. ३ डिसेंबरपर्यंत तुमसर तालुक्यातील १२ हजार ७०३ पैकी केवळ २८९७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती पत्र दिले आहे. येथे संमती पत्राचा आधार धरल्यास केवळ २३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात नऊ ते बारावी असे वर्ग भरण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील शाळा प्रशासनाने शाळा सुरू केल्या. परंतु त्यास पालकांच्या अल्प प्रतिसाद मिळत आहे. वर्ग ८ ते १२ मध्ये एकूण विद्यार्थी संख्या १२ हजार ७०३आहे.
त्यापैकी केवळ २१९७ पालकांनीच विद्यार्थ्यांचे संमती पत्र दिले. संमतीपत्र दिल्यानंतरही अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहत आहेत. शालेय शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रथम आरटीपीसीआर व त्यानंतर ॲन्टीजेन टेस्ट करण्यास सांगितले. यात काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव आढळले.
तुमसर तालुक्यात वर्ग नऊ ते बाराच्या ६० शाळा आहेत येथे ३९९ शिक्षक व २७८ शिक्षकेतर कर्मचारी दर दिवशी हजर आहेत.
स्थानिक शिक्षण विभाग त्याचे अधिकारी व कर्मचारी शाळांना भेटी देत आहेत. दोन दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी संजय डोरलीकर यांनीसुद्धा भेटी दिली. शिक्षकांना मुख्याध्यापकांना व स्थानिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
पालक अनुत्सुक
विद्यार्थी पाठविण्यास पालक येथे उत्सुक दिसत नाहीत. एसटी महामंडळाने मानव विकास अंतर्गत बसगाड्या सुरू केले आहेत. स्थानिक विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक दिसत नाही. शिक्षण विभाग दर दिवशी शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेत आहे. परंतु त्यात वाढ होताना दिसत नाही. शाळा प्रशासनाने सर्व सुविधा विद्यार्थ्याकरिता उपलब्ध करून दिले आहेत, हे विशेष.
तुमसर तालुक्यात एकूण ६० शाळा असून सर्व शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. पालकांची संमती पत्र विद्यार्थी घेऊन येत आहेत. यामध्ये पुन्हा वाढ होत आहे. विद्यार्थी व पालकांचा आत्मविश्वास वाढवण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. येथे आठ ते दहा दिवसांमध्ये विद्यार्थी संख्या निश्चितच वाढेल असा आम्हाला विश्वास आहे.
-विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी तुमसर.