टोलनाका त्वरीत बंद करा
By admin | Published: December 31, 2015 12:30 AM2015-12-31T00:30:35+5:302015-12-31T00:30:35+5:30
वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करणारे अशोक कंपनीकडून अद्याप टोलनाका लावून शुल्क वसूली केली जाते. मुदत संपूनही सुरू असणारा हा टोल नाका बंद करावा, ...
निवेदन : छावा संग्राम परिषदेची मागणी
भंडारा : वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करणारे अशोक कंपनीकडून अद्याप टोलनाका लावून शुल्क वसूली केली जाते. मुदत संपूनही सुरू असणारा हा टोल नाका बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छावा संग्राम परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या टोलनाक्याची मुदत २०१४ ला संपली. पुल निर्मिती करणाऱ्या या कंपनीने या माध्यमातून कोट्यवधी रूपये कमावले. तरीही या मार्गावरून रहदारी करणारे वाहन चालकांना वेठीस धरून त्यांची लुट केली जात आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांसाठी टोलनाका मुक्त करण्यात यावा, अशी मागणी छावा संग्राम परिषदेने केली आहे.
शिष्टमंडळात मकसुद पटेल, देवेंद्र गावंडे, शिवा गायधने, लक्ष्मीकांत थोटे, उमेश मोहतुरे, अरविंद ढोमणे, मंगेश तुरस्कर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)